Kaali Poster controversy : दिल्ली न्यायालयाने चित्रपट निर्मात्याला नव्याने समन्स बजावले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kaali Poster controversy News

Kaali Poster controversy : दिल्ली न्यायालयाने निर्मात्याला नव्याने समन्स बजावले

Kaali Poster controversy News दिल्लीतील न्यायालयाने चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई (Leena Manimekalai) हिला आगामी काली (Kaali) माहितीपटाच्या पोस्टर्स आणि व्हिडिओंमध्ये हिंदू देवतांचे कथितपणे चुकीचे चित्रण केल्याप्रकरणी मनाई आदेश मागणाऱ्या याचिकेवर नवीन समन्स बजावले आहे.

न्यायालयाने यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी चित्रपट निर्माता लीना मणीमेकलाई हिला समन्स बजावले होते की, कोणताही आदेश देण्यापूर्वी सुनावणी झाली पाहिजे. मात्र, न्यायाधीश रजेवर असल्याने प्रकरण पुढे ढकलण्यात आले.

हेही वाचा: KRK Arrested : केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पहा

प्रतिवादी मणीमेकलाई (Leena Manimekalai) आणि टूरिंग टॉकिज मीडिया वर्क्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनी हजर झाली नाही हे लक्षात घेऊन अतिरिक्त वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश अभिषेक कुमार यांनी ईमेल आणि व्हॉट्सॲपसह सर्व मार्गांनी नवीन समन्स जारी करण्याचे निर्देश दिले.

न्यायालयाने आपल्या २९ ऑगस्टच्या आदेशात म्हटले आहे की, आरोपींना ईमेल तसेच व्हॉट्सॲपसह सर्व मार्गांनी समन्स बजावण्यात यावे. न्यायालयाने प्रतिवादींना समन्स बजावण्यासाठी आणि याचिकेवर युक्तिवाद करण्यासाठी १ नोव्हेंबरची तारीख निश्चित केली आहे.

हेही वाचा: मौनीचा ‘ब्रह्मास्त्र’; पारंपरिक लूक पाहून चाहते हरले हृदय

अधिवक्ता राज गौरव यांनी दाखल केलेल्या याचिकेत काली माहितीपटाच्या पोस्टर्स आणि प्रमोशनल व्हिडिओमध्ये हिंदू देवतांचे अत्यंत अयोग्य पद्धतीने चित्रण केल्याचा आरोप करीत चित्रपट निर्मात्याविरुद्ध कायमस्वरूपी आणि अनिवार्य मनाई आदेश देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Kaali Poster Controversy Delhi Court Issues Summons Filmmaker Leena Manimekalai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :delhiCourtcontroversy