KRK Arrested : केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पहा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK Arrested Funny Memes News

KRK Arrested : केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर मीम्सचा पाऊस; पहा

KRK Arrested Funny Memes News कमाल रशीद खानला (KRK) २०२० मध्ये वादग्रस्त ट्विट केल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. कमाल रशीद खानला मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर अटक करण्यात आली. केआरकेच्या अटकेनंतर सोशल मीडियावर अनेक मीम्स व्हायरल झाले आहेत.

केआरके सोशल मीडियावर बॉलिवूडविरुद्ध बोलण्याची एकही संधी सोडत नाही. अटकेनंतर बॉलिवूडचे चाहते आता केआरकेची खिल्ली उडवत आहेत. सोशल मीडियावर युजर्सनी मजेदार मीम्स शेअर केले आहेत. केआरकेच्या चित्रपटातील दृश्ये शेअर करताना एका युजरने मजेदार कमेंट्सही केल्या आहेत. अलीकडे बॉयकॉट गँगप्रमाणेच केआरकेही मोठ्या स्टार्सच्या चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याची मागणी करीत होता.

या संदर्भात एका वापरकर्त्याने मीम शेअर केला आहे. ज्यामध्ये संजय दत्तच्या ग्रुप फोटोमध्ये दुःखी चेहरे बॉयकॉट गँगशी संबंधित दाखवले आहेत. केआरकेच्या (KRK) अटकेनंतर युजरने बॉयकॉट गँग असे लिहिले आहे. दुसऱ्या युजरने केआरकेची सध्याची परिस्थिती पाहता गँग्स ऑफ वासेपूर या चित्रपटाचा एक शॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये तो गँगसोबत जाताना दिसत आहे. हा फोटो शेअर करताना युजरने लिहिले केआरकेच्या अटकेनंतर त्याचे चाहते त्याच्यासाठी धावत आहेत. परंतु, हे लक्षात ठेवा केआरकेचे अजिबात चाहते नाहीत.

केआरकेच्या अटकेनंतर अनेक मीम्समध्ये बॉलिवूड (Bollywood) सेलिब्रिटींचे डान्स व्हिडिओ अपलोड केले जात आहेत. काही व्हिडिओंमध्ये करण जोहरला दाखवले आहे तर काही व्हिडिओमध्ये (Video Viral) आमिर, शाहरुखचे डान्स व्हिडिओ शेअर केले जात आहेत. एका युजरने करण जोहरचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये केआरकेच्या अटकेनंतर करण जोहरची प्रतिक्रिया पाहायला मिळत आहे.

काय आहे प्रकरण?

ऋषी कपूर आणि इरफान खान यांच्याबद्दल चुकीचे ट्विट केल्याने केआरकेला २०२० मध्ये अटक करण्यात आली होती. सोशल मीडियावर केआरकेच्या द्वेषपूर्ण ट्विटविरोधात गुन्हा दाखल केला होता. युवा सेनेचे सदस्य राहुल कानाल नावाच्या व्यक्तीने ही तक्रार केली आहे. तक्रारीत इरफान खान आणि ऋषी कपूर यांच्यावर केलेल्या ट्विटचाही संदर्भ दिला आहे. आता केआरकेच्या अटकेनंतर हे ट्विट पुन्हा व्हायरल होत आहेत.

Web Title: Krk Arrested Funny Memes Going Viral Social Media

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..