'कहानी घर घर की'च्या साक्षीनं का केलं नाही लग्न?: पार्वतीची भूमिका केली लोकप्रिय|Kahani Ghar Ghar Ki Sakshi Tanwar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Kahani Ghar Ghar Ki  Sakshi Tanwar

'कहानी घर घर की'च्या साक्षीनं का केलं नाही लग्न?: पार्वतीची भूमिका केली लोकप्रिय

Kahani Ghar Ghar Ki Actress Sakshi Tanwar: टीव्ही मनोरंजन विश्वामध्ये प्रचंड लोकप्रियता मिळालेली मालिका म्हणून कहानी घर घर की चे (Tv Entertainment News) नाव अनेकांच्या तोंडी होते. या मालिकेला प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. प्रेक्षक कहानी घर घर की मालिकेचे मोठे फॅन झाले होते. (Bollywood news) त्यातील कलाकार, त्यांचा अभिनय हे सारं प्रेक्षकांच्या कौतुकाचा विषय होता. आता या मालिकेतील मुख्य कलाकार साक्षी तनवार (Sakshi Tanwar) विषयीची एक वेगळी बातमी समोर आली आहे. तिनं गेल्या आठ वर्षांपासुन एकही लग्न अटेंड केलं नाही. ती कुणाच्या लग्नाच्या पार्टीलाही गेली नाही. एका मुलाखतीमध्ये तिनं याविषयी खुलासा केल्याचे दिसून आले. सोशल मीडियावर साक्षी तनवर ही लोकप्रिय सेलिब्रेटी आहे. असं काय कारण होतं की, त्यामुळे साक्षीनं लग्न करण्यास नकार दिला आणि ती तशीच राहिली?

साक्षीनं एका मुलाखतीत सांगितलं की, 2000 ते 2008 दरम्यान मी फक्त माझ्या कामावर लक्ष केंद्रीत केलं होतं. त्यामुळे मी कुणाच्या लग्नाला गेले नाही. त्यांच्या पार्टीमध्ये देखील कधी सहभागी झाले नाही. मला माझं आयुष्य हे फार संतुलितपणे जगायचं होतं. त्यामध्ये कुणाचीही आडकाठी मला नको होती. त्यामुळे मी माझ्या अटी आणि शर्तींवर जगत आले आहे. मला माझ्या मुलीसाठी पुरेसा वेळही द्यायचा होता. 2018 मध्ये साक्षीनं नऊ महिन्याच्या दित्याला दत्तक घेतलं होतं. त्यानंतर ती सिंगल पॅरेंट झाली होती. स्टार प्लसवर आठ वर्ष कहानी घर घर की ही मालिका प्रसारित होत होती. त्याला मिळणारा प्रतिसादही प्रचंड होता. त्याचा चाहतावर्गही संख्येनं मोठा होता. साक्षीनं त्या मालिकेमध्ये पार्वतीची भूमिका केली होती. तर किरण कमरकरनं तिच्या पतीची ओम अग्रवालची भूमिका वठवली.

मी पहिल्यापासून फार वेगळ्या पद्धतीनं विचार केला आहे. प्रत्येक गोष्टीचा आपल्यावर काय परिणाम होणार आहे यानुसार मी माझी लाईफ स्टाईल निवडली आहे. एक वेळ अशी होती की, माझ्यासाठी माझं काम हे माझ्यासाठी सर्वस्व होतं. त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टीत मला रस नव्हता. आताही मी अशा टप्प्यावर आले आहे की, मला खूप काम करायचे आहे. त्यामुळे अन्य कोणत्याही गोष्टींचा मी फार गांभीर्यानं विचार करत नाही. माझ्या आयुष्यात ज्या गोष्टी फिट बसतात त्याला मी फॉलो करते. अन्य कोणत्याही बाबत चर्चाही करत नसल्याचे साक्षीनं सांगितलं होतं.

Web Title: Kahani Ghar Ghar Ki Sakshi Tanwar Revealed Why She Not Ready To Wedding

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top