
Krissann Barretto Court Marriage: प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री क्रिसान बॅरेटो हिने अनेक मालिकांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात वेगळी जागा निर्माण केली आहे. तिला खरी ओळख 'कैसी ये यारियां' या मालिकेतून मिळाली. आता क्रिसान चर्चेत आली आहे. क्रिसानने तिचा प्रियकर नॅथन करमचंदानी सोबत लग्नगाठ बांधली आहे. सध्या त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
क्रिसानने अगदी साध्या पद्धतीने कोर्ट मॅरिज केले आहे. शाही लग्न किंवा कसलाही देखावा न करत साधा पांढरा गाउन परिधान करुन दोघांनी कोर्ट मॅरेज केले आहे. क्रिसानने केलेल्या या साध्या लग्नाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. नेटकरी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत.
Krissann आणि Nathan च्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दोघांनी कोर्टात जाऊन लग्न केले. त्यांनी एकमेकांना हार घालून लग्नाच्या कागदपत्रांवर सह्या केल्या. त्यानंतर कुटुंब आणि मित्रांसोबत एक छोटीशी पार्टी केली. यापुर्वी 23 एप्रिल 2023 रोजी क्रिसनने नॅथनसोबतच्या तिच्या एंगेजमेंटचे फोटो शेअर केले होते. आता दोघांनी लग्न केले आहे.
'कैसी ये यारियां' या मालिकेत तिने आलिया सक्सेनाची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर ती 'Ace of Space 2' मध्येही दिसली. तिने इश्कबाज मालिकेतही काम केले आहे. ती मुंबईची रहिवासी असून तिने येथेच शिक्षण घेतले आहे. तर तिचा पती नॅथन हा यूकेचा आहे. क्रिसन बऱ्याच दिवसांपासून नॅथनला डेट करत होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.