Kajol: काजोलचा नादच करायचा नाही.. आईला भेट दिला कोट्यावधीचा बंगला.. झलक तर पाहा

Kajol And Tanisha Mukerji Gifted Bungalow To Mother
Kajol And Tanisha Mukerji Gifted Bungalow To MotherEsakal

बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रीमध्ये काजोलची गणना होते. काजोल ही एक अभिनेत्री असल्याबरोबरच ती एक उत्तम पत्नी आणि आई देखील आहे मात्र आता तिने असं काही केलं आहे की त्यावरुन ती एका उत्तम मुलगीही असल्याचं सिद्ध केलंय. काजोल आणि तिची बहीण तनिषा मुखर्जी या बहिणींची जोडी बॉलिवूडमध्ये लोकप्रिय आहेत. (Kajol And Tanisha Mukerji Gifted Bungalow To Mother)

Kajol And Tanisha Mukerji Gifted Bungalow To Mother
Tunisha Sharma: प्रेस घेत पोलिसांनी केले अनेक खुलासे.. शिझानला 4 दिवसांची पोलिस कोठडी..

त्यांची एकमेकांशी असलेली बॉण्डिंग खूप जास्त चांगली आहे. त्यांची जोडी चाहत्यांची आवडती आहे. दोघीही बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांच्या मुली आहेत. तनुजा यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक हिट सिनेमे दिले. आपल्या अभिनयाने त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली. त्यांचा हा वारसा आता काजोल आणि तनिषा जपत आहेत. तनिषाला काजोल इतकं यश मिळालं नसलं तरी तिही चर्चेत असते. या मायलेकींची जोडी प्रेक्षकांची आवडती आहे. आता काजोलने आपली बहीण तनिषासोबत मिळून आईला खूप मोठी भेट दिली आहे. त्यांनी आईसाठी एक आलिशान बांगला खरेदी केला आहे.

काजोल आणि तनिषा मुखर्जी यांनी त्यांची आई तनुजा यांना लोणावळ्यात नवीन घर देऊन आश्चर्यचा धक्का दिला आहे. बंगला बांधण्यासाठी सुमारे आठ महिने लागले. रिबन कापताना या तिघांनी आनंदात घरात प्रवेश करतानाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर व्हायरल होत आहे. घरात प्रवेश करताच त्यानी आदराने जमिनीला स्पर्श केला.

Kajol And Tanisha Mukerji Gifted Bungalow To Mother
Tunisha Sharma : तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त करायला लावणारा शीजान खान आहे तरी कोण?

तनिषा मुखर्जीने तिच्या इंस्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ टाकला आणि त्याला कॅप्शन दिले, 'आणि म्हणून आम्ही लोणावळ्यात आईला घर दिलं 8 महिन्यांपासून तिला लांब ठेवल्यानंतर तिला दाखवला!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com