काजोलने जुहूमध्ये खरेदी केले 11.95 कोटी रुपयांचे दोन अपार्टमेंट

Kajol
KajolBollywood news

अभिनेत्री काजोलने (Kajol) जुहूच्या अनन्या इमारतीत दोन अपार्टमेंट खरेदी केले आहेत. Squarefeetindia नुसार, अभिनेत्रीने इमारतीच्या 10व्या मजल्यावर असलेले दोन फ्लॅट खरेदी केले आहेत. अहवालात पुढे म्हटले आहे की दोन्ही मालमत्तांची एकत्रित किंमत 11.95 कोटी रुपये आहे.

हा व्यवहार यावर्षी जानेवारी महिन्यात झाला. अहवालानुसार, दोन्ही फ्लॅटचे कार्पेट क्षेत्रफळ सुमारे 2000 चौरस फूट आहे. ही इमारत तिचा सध्याचा शिवशक्ती बंगला आहे त्याच परिसरात आहे. मालमत्तेच्या कागदपत्रांवर काजोल विशाल देवगणची (Kajol Vishal Devgan) त्रिक्षा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडची स्वाक्षरी होती.

दरम्यान, वर्क फ्रंटवर, काजोल शेवटची रेणुका शहाणे (Renuka Shahane) दिग्दर्शित 'त्रिभंगा: तेढी मेढी क्रेझी' (Tribhanga: Tedhi Medhi Crazy) मध्ये दिसली होती. तन्वी आझमी (Tanvi Azmi) आणि मिथिला पालकरसह (Mithila Palkar) काजोलची भूमिका असलेला हा चित्रपट गेल्या वर्षी जानेवारीमध्ये ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.

याशिवाय, अभिनेत्री सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे आणि चाहत्यांना तिच्या आयुष्याबद्दल नियमित पोस्ट्सद्वारे अपडेट करत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com