काजोलचे तमीळमध्ये कमबॅक 

वृत्तसंस्था
सोमवार, 2 जानेवारी 2017

धनुष आणि काजोल यांचा चित्रपट वेलाइया पट्टाधारी-2(व्हीआयपी-2) चा फर्स्ट लुक सौंदर्या रजनीकांतने सोशल मीडियावरून प्रसिद्ध केला आहे. काजोल आणि धनुषच्या चाहत्यांना शनिवारी हे नवीन वर्षाचे गिफ्ट असल्याचे सौंदर्याने म्हटले आहे.

या अनपेक्षित गिफ्ट बद्दल धनुषने आनंद व्यक्त केला आहे. दोन दशकांनंतर पुन्हा एकदा दाक्षिणात्य चित्रपटात काजोलने वापसी केली आहे. या चित्रपटासाठी काजोलला चार कोटींची ऑफर होती. 1997 मध्ये "मिनसारा काना' या चित्रपटातून काजोलने तमीळ चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले होते. प्रभुदेवा आणि अरविंद स्वामी तिचे सहकलाकार होते.

काजोल बॉलिवूडमध्ये दुसरी इनिंग खेळत आहे. हा चित्रपट किती व्यवसाय करतो, हे पाहणे रंजक ठरेल. चित्रपटाच्या शूटिंगनंतरच रिलीजची तारीख चाहत्यांना कळेल.  

Web Title: Kajol Come back in Tamil