Kajol Video: मोबाईल बघत चालली होती, काजोलला अंदाजच आला नाही! जे घडलं ते....

काजोलचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तिच्या छोट्याशा निष्काळजीपणामुळे तिचा मोठा अपघात होऊ शकला असता.
Kajol Devgan
Kajol DevganEsakal

सध्या सर्वत्र नवरात्री हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. बॉलीवूड सेलिब्रिटी नुकतेच दुर्गापूजनासाठी एका कार्यक्रमात सहभागी झालेले दिसत आहे. अभिनेत्री काजोल, राणी मुखर्जी, अयान मुखर्जी, तनुजा यांच्यासह संपूर्ण कुटुंब दुर्गा पूजेचे कार्यक्रमात दिसले.

यावेळी काजोलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. पुजेसाठी काजोलने गुलाबी रंगाच्या साडीत नेसली होती.

मात्र, यावेळी काजोलसोबत असं काही घडलं की त्याची सर्वत्र चर्चा सुरु झाली. काजोलचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.

Kajol Devgan
'प्रत्येकाला स्वतःच्या देशाचा..",पाकिस्तान झिंदाबाद'चे नारे लावू न देणाऱ्या पोलिसाबाबत नकुल मेहताची प्रतिक्रिया चर्चेत..

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ काजोल मुलासोबत दुर्गापूजेत सहभागी झाली होती. यावेळी काजोल तिच्या फोनमध्ये इतकी व्यस्त दिसते की ती पुढे न पाहता चालत होती, तितक्यात स्टेज संपला आणि काजोल खाली पडता पडता वाचली. तिथे उभ्या असलेल्या लोकांनी लगेचच तिला सावरले.

Kajol Devgan
Israel Hamas War : 'गाझापट्टीवरील हल्ले थांबवा', हॉलीवूड मधील ५० कलाकारांचे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना पत्र! आपले कलाकार मात्र...

यानंतर तिचा लेक युग तिची काळजी घेताना दिसला. त्यानंतर काजोल तिचा फोन बाजूला ठेवते. यावेळी तिच्या चेहऱ्यावरुन दिसत की तिला किती वेदना होत आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर काजोलच्या चाहत्यांना तिची काळजी वाटत आहे तर काहींनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. अनेकांनी या व्हिडिओच्या कमेंट करत तिच्या तब्येतीची विचारपुस केली आहे.

Kajol Devgan
Ira Khan: "मी डिप्रेशनशी झुंजत होती तेव्हा..", होणाऱ्या नवऱ्यासाठी आमिरच्या लेकीची खास पोस्ट

काजोल आणि शाहरुख खान स्टारर 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे'ने चित्रपटाला 28 वर्ष पुर्ण झालीत. राज आणि सिमरनच्या प्रसिद्ध ऑन-स्क्रीन भूमिका असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य चोप्रा यांनी केले होते. काजोल शेवटची लस्ट स्टोरीज आणि द ट्रायल या वेबसिरिजमध्ये दिसली आहे. काजोल सोशल मिडियावर खुप सक्रिय असते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com