KRK Son: वडिलांच्या जीवाला धोका, मारण्याचा होतोय प्रयत्न केआरकेच्या मुलाचं ट्विट

बॉलीवूडचा अभिनेता आणि चित्रपट समीक्षक अशी ओळख असलेल्या केआरकेवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होताना दिसून आले आहे.
Kamaal R Khan Son faisal save my father life  news
Kamaal R Khan Son faisal save my father life newsesakal
Updated on

Kamaal R Khan Son faisal: बॉलीवूडचा अभिनेता आणि चित्रपट समीक्षक अशी ओळख असलेल्या केआरकेवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप होताना दिसून आले आहे. काही दिवसांपूर्वी त्याला त्यानं केलेल्या एका व्टिटप्रकरणात अटक करण्यात (entertainment News) आली होती. दोन आठवड्यांहून अधिक काळ तो तुरुंगात होता. या दरम्यान त्याला मारण्याची धमकी आल्याचे त्याच्या मुलानं फैझल कमालनं सोशल मीडियावरुन सांगितलं आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मोठ्या चर्चेला उधाण आले आहे. त्यानं केलेल्या व्टिटला चाहत्यांचा आणि नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे.फैझलनं हे व्टिट अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख यांना टॅगही केलं आहे.

मी 23 वर्षांचा असून सध्या लंडनमध्ये आहे. गेल्या काही दिवसांपासून माझे वडील अडचणीत असल्याचे मला कळाले आहे. त्यांना जेलमध्ये धमकावण्यात आले. तसेच जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. अशी माहिती फैझलनं व्टिटवरुन दिली आहे. काही करुन माझ्या वडिलांची मदत करा. मी लंडनमध्ये असल्यानं मला त्यांना कसे वाचवायचे हा प्रश्न पडला आहे. त्यामुळे माझी विनंती आहे की, मी जे काही म्हणतो आहे त्याचा गांभीर्यानं विचार करावा. फैझलच्या त्या ट्विटला अनेकांनी प्रतिसाद देऊन जे काही होतं आहे त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Kamaal R Khan Son faisal save my father life  news
Bail To KRK : वादग्रस्त ट्विटसह विनयभंग प्रकरणात केआरकेला जामीन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देखील फैझलनं व्टिट टॅग केले आहे. काही दिवसांपासून कमाल खानची डोकेदुखी वाढली आहे. त्यानं बॉलीवूडच्या अनेक चित्रपटांवर दिलेल्या रिव्ह्युमुळे अभिनेत्यांची बदनामी झाल्याचे सांगितले जात आहे.

Kamaal R Khan Son faisal save my father life  news
Sonali Phogat च्या पतीची हत्या आणि KRK चे शॉकिंग दावे, पुन्हा होत आहेत Viral

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com