Bail To KRK : वादग्रस्त ट्विटसह विनयभंग प्रकरणात केआरकेला जामीन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bail To KRK Latest News

Bail To KRK : वादग्रस्त ट्विटसह विनयभंग प्रकरणात केआरकेला जामीन

Bail To KRK Latest News चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमाल आर खानला (KRK) वादग्रस्त ट्विट प्रकरणात मुंबई न्यायालयाने जामीन (Bail) मंजूर केला आहे. त्याने अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माता राम गोपाल वर्मा यांच्याबद्दल वादग्रस्त ट्विट केले होते. मंगळवारी मुंबईतील आणखी एका न्यायालयाने २०२१ च्या विनयभंग प्रकरणात (Molestation Case) केआरकेला जामीन मंजूर केला होता. केआरके सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मागच्या आठवड्यात मुंबई पोलिसांनी त्याला मुंबई विमानतळावरून अटक केली होती.

कमाल आर खानची गुरुवारी कधीही तुरुंगातून सुटका होण्याची शक्यता आहे. केआरकेची पोस्ट जातीयवादी आहे. त्याने बॉलिवूड सेलिब्रिटींना लक्ष्य केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. केआरकेचे वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांनी जामीन अर्जात म्हटले की, ट्विट फक्त ‘लक्ष्मी बॉम्ब’ (हा चित्रपट नंतर लक्ष्मी नावाने प्रदर्शित झाला) नावाच्या चित्रपटावर केले गेले होते. हा कोणताही अपराध नाही.

हेही वाचा: राहुल गांधींची ‘भारत जोडो यात्रा’; अभिनेत्री पूजा भट्टचे ट्विट चर्चेत, म्हणाली...

केआरके चित्रपटसृष्टीत समीक्षक किंवा रिपोर्टर म्हणून काम करीत असल्याचेही जामीन अर्जात म्हटले आहे. केआरकेवर (KRK) २०२० मध्ये IPC च्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल केला होता. ज्यात १५३ (दंगल भडकवण्याच्या हेतूने प्रवृत्त करणे) आणि ५०० ​​(बदनामीसाठी शिक्षा) आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या तरतुदींचा समावेश आहे.

विनयभंग प्रकरणी (Molestation Case) वर्सोवा पोलिसांनी केआरकेला रविवारी ताब्यात घेतले आणि वांद्रे न्यायालयात हजर केले. केआरकेचे वकील अशोक सरोगी आणि जय यादव यांनी वांद्रे दंडाधिकारी न्यायालयात दाखल केलेल्या जामीन अर्जात दावा केला की, एफआयआरमधील मजकूर कथित विनयभंगाच्या घटनेशी व्यावहारिकपणे जुळत नाही.

हेही वाचा: इंडिगोच्या कर्मचाऱ्यांचे गायिका मैथिली ठाकूरसोबत गैरवर्तन; ट्विट करून म्हणाली...

केआरकेने दारू प्यायला लावली

जून २०२१ मध्ये २७ वर्षीय महिलेच्या तक्रारीच्या आधारे IPC च्या कलम ३५४ (A) आणि ५०९ अंतर्गत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. केआरकेने महिलेला चित्रपटात मुख्य भूमिकेची ऑफर देण्याच्या बहाण्याने वर्सोवा येथील बंगल्यावर बोलावले होते, असा आरोप तक्रारकर्त्याने केला होता. केआरकेने दारू प्यायला लावली आणि अयोग्यरित्या स्पर्श केला.

Web Title: Krk Actor Bail Molestation Case Controversial Tweet

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :KRKbailMolestation