KRK च्या अडचणीत वाढ, १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

KRK

KRK च्या अडचणीत वाढ, १४ दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी

Kamaal Rashid Khan Or KRK News : अभिनेता कमाल रशीद खान (KRK) याला रविवारी बांद्रा न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती वर्सोवा पोलिसांनी दिली. त्याला ३० ऑगस्ट रोजी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. केआरकेने वादग्रस्त ट्विट केल्याने सदरील कारवाई करण्यात आली.

त्यानंतर त्याला बोरिवली न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली होती. कमाल रशीद खानने शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी वर्सोवा पोलिसांनी त्याला अटक केली. हे प्रकरण आहे २०१९ मधील. बोरिवली येथील 24th MM न्यायालयाने ट्रान्सफर आॅर्डर दिल्याने वर्सोवा पोलिसांनी अटक केली. (Bollywood News)

केआरके आपल्या वेगवेगळ्या वक्तव्यामुळे नेहमी चर्चेत राहत होता. त्याने लाइगर चित्रपट पाहिला. तो न आवडल्याने त्याने करण जोहरकडे १ हजार रुपयांची मागणी केली होती.