'ब्रह्मास्त्र'ची दमदार सुरुवात, प्रदर्शनापूर्वीच २७ हजार तिकिटांची विक्री

रणबीर कपूर आणि आलिया भटची मुख्य भूमिका असलेल्या 'ब्रह्मास्त्र' चित्रपटाची दमदार सुरुवात
Brahmastra Movie News
Brahmastra Movie Newsesakal

Brahmastra Advance Booking News : बॉलिवूडमध्ये सध्या एकापाठोपाठ एक मोठे चित्रपट फ्लॉप होत आहेत. दरम्यान, रणबीर कपूर आणि आलिया भट यांची मुख्य भूमिका असलेला फँटसी अॅडव्हेंचर 'ब्रह्मास्त्र पार्ट वन : शिवा'ने बॉलिवूडला थोडा दिलासा दिला आहे. अयान मुखर्जीचा बहुप्रतिक्षित चित्रपट ब्रह्मास्त्र ९ सप्टेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

आगाऊ (अॅडव्हान्स) बुकिंगमध्ये या चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे वर्ष बॉलिवूडसाठी फारसे चांगले गेले नाही. अशा परिस्थितीत निर्मात्यांशिवाय, वितरकांपासून ते थिएटर मालकांपर्यंत सर्वांनाच या चित्रपटाकडून खूप अपेक्षा आहेत.

Brahmastra Movie News
Kangana Ranaut : कंगनाचा जावई शोध, महेश भट मुस्लिम असल्याचा केला दावा

चित्रपटाची आगाऊ बुकिंग

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, ब्रह्मास्त्रची आगाऊ बुकिंग (Brahmastra) अखेर उद्योगासाठी काहीसा दिलासा म्हणून पुढे येत आहे. तिकिटांच्या संख्येचा संदर्भ देताना ते म्हणाले की, पहिल्या दिवशी ११,५५८ तिकिटांचे आगाऊ बुकिंग झाले आहे. कारण ही सुविधा फक्त निवडक शहरांमध्येच उपलब्ध आहे.

आगाऊ बुकिंगबद्दल बोलायचे तर, शुक्रवारी एकूण तिकीट विक्रीपैकी ६३% शुक्रवारी, शनिवारी २५% आणि रविवारी १२% विक्री झाली. प्री-बुकिंगच्या २४ तासांपेक्षा कमी कालावधीत, चित्रपटाने पीव्हीआर, आयनाॅक्स आणि सिनेपोलिसवर जवळपास २७ हजार तिकिटे विकली गेली आहेत. (Bollywood News)

Brahmastra Movie News
तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

चित्रपटाचे बजेट 400 कोटी रुपये आहे

ब्रह्मास्त्र हा २०२२ मधील सर्वात महागडा चित्रपट आहे. चित्रपटाचे एकूण बजेट ४०० कोटी रुपये आहे. अशा परिस्थितीत बॉक्स ऑफिसवर यशस्वी होण्यासाठी पहिल्या दिवसाची कमाई खूप महत्त्वाची ठरणार आहे. यात रणबीर कपूर (Ranbir Kapoor), आलिया भट, अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), नागार्जुन आणि मौनी रॉय यांची भूमिका आहे. या चित्रपटात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण कॅमिओ करत आहेत. त्याची निर्मिती करण जोहर करत असून दिग्दर्शन अयान मुखर्जी यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com