'माझ्यात असे काय आहे की लोकं मला एवढा त्रास देतात'

Kananga tweet against Maharashtra government
Kananga tweet against Maharashtra government

मुंबई - कंगणाच्या मागे लागलेले वाद काही संपण्याचे नाव घ्यायला तयार नाही. ती सोशल मीडियातून वेगवेगळी चिथावणीखोर वक्तव्ये करत राहत असल्याने त्याचा परिणाम तिच्या टीकाकारांवर होताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी तिनं थेट राज्याचे मुख्यमंत्री आणि सरकारच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली. सोशल मीडियावर व्यक्त होताना कुठलाही व कुणाचाही मुलाहिजा न ठेवणा-या कंगणावर तोंडसुख घेणा-यांची संख्या काही कमी नाही.

आता पुन्हा कंगणा तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरुन सर्वांच्या टीकेची लक्ष्य झाली आहे. त्याचे झाले असे की, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कंगनाचा नटी असा उल्लेख केला. त्यानंतर कंगनाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत महाराष्ट्र सरकारने जो अपमान आणि शिवीगाळ केली त्यांच्यापुढे आदित्य पांचोली आणि हृतिक रोशन सारखे लोक मला भले वाटू लागले आहेत, अशाप्रकारची कमेंट तिनं केली आहे. कंगणा असं का म्हणाली असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. त्यावरुन तिनेच याबद्दल सांगितले आहे.

कंगणाने महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे. त्यावरुन लिहिलेल्या पोस्टमध्ये ती म्हणते की. "गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्र सरकारकडून इतके कायदेशीर खटले, शिवीगाळ, अपमान आणि बदनामी सहन केली आहे की बॉलिवूड माफिया, आदित्य पांचोली आणि हृतिक रोशनसारखे लोक आता चांगले वाटत आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्यात असे काय आहे जे लोक मला एवढा त्रास देतात", असा प्रश्नदेखील तिने यावेळी उपस्थित केला  आहे.

उच्च न्यायालयाने शुक्रवारी कंगणाच्या बाजूने निकाल दिला.  त्यानंतर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आपली प्रतिक्रिया दिली.   एमएमसी कायद्यानुसार (MMC Act) कारवाई करण्यात आली आहे. अनधिकृत बांधकाम (Illegal Construction) सुरू असताना 354 अ अंतर्गत 24 तास अगोदर नोटीस दिली होती असे त्या म्हणाल्या होत्या. कारवाई सुडापोटी केली असेल तर मग त्या नटीने पीओके म्हणून जो अपमान मुंबईचा केला, त्यावर कुठल्या कोर्टात दाद मागायची ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

न्यायालयाच्या निर्णयानंतर कंगनाने तिच्या आगामी थलाइवीच्या शूटिंग सेटवरुन सोशल मीडियावर एक थँक्यू व्हिडिओ शेअर केला आहे, यात तिने आपल्या या विजयाला लोकशाहीचा विजय म्हटले आहे. कंगणाला ही नोटीस काही पहिल्यांदा देण्यात आलेली नाही. अनेक नोटीसा पूर्वी दिल्या गेल्या आहेत.  अशा या निर्णयाचा परिणाम संपूर्ण मुंबईतील अनधिकृत बांधकामांसंदर्भात होईल असेही किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

आपल्या सोशल मीडियाच्या पोस्टविषयी सांगताना ती म्हणाली की, मला हिंमत देणाऱ्या सर्वांचे आभार आणि माझ्या तुटलेल्या स्वप्नांवर हसणाऱ्यांचेही आभार. कारण तुम्ही व्हिलन झालात म्हणूनच मी हिरो ठरले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com