'भोळ्या ग्राहकांना फसवणं थांबवा'; आलियाच्या जाहिरातीवर कंगनाची टीका

'कन्यादान नव्हे कन्यामान' अशी संकल्पना मांडणाऱ्या या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली आहे.
kangana alia
kangana alia

अभिनेत्री आलिया भट्टने Alia Bhatt 'मोहे' Mohey या ब्रँडसाठी केलेली जाहिरात सध्या चांगलीच चर्चेत आहे. 'कन्यादान नव्हे कन्यामान' अशी संकल्पना मांडणाऱ्या या जाहिरातीवर अनेकांनी टीका केली आहे. त्यातच आता अभिनेत्री कंगना रणौतचाही Kangana Ranaut समावेश झाला आहे. धर्म आणि जनतेच्या भावनांशी खेळणं बंद करा, अशी तिने सर्व ब्रँड्सना विनंती केली आहे. Alia Bhatt Ad Controversy

कंगनाने काय म्हटलं?

कंगनाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये तिने आलिया भट्ट आणि मोहे या फॅशन ब्रँडला टॅग करत लिहिलं आहे, 'सर्व ब्रँड्सना माझी नम्र विनंती आहे की वस्तूंच्या विक्रीसाठी धर्म, अल्पसंख्याक, बहुसंख्याक असं राजकारण करू नये. हिंदू आणि त्यांच्या परंपरांचा अपमान करू नका.' कंगनाने पुढे उदाहरण देत म्हटलं, 'आपण अनेकदा टीव्हीवर पाहतो की जेव्हा एखादा जवान सीमेवर शहीद होतो, तेव्हा त्याचे वडील म्हणतात की हरकत नाही. माझा दुसरा मुलगासुद्धा मी पृथ्वी मातेसाठी देईन. कन्यादान असो किंवा पुत्रदान असो, समाज ज्याप्रकारे या संकल्पनेकडे पाहतो, त्यातून परंपरांवरील विश्वास व्यक्त होतो. जेव्हा ते दानधर्माच्या संकल्पनेला दुय्यम महत्त्व देण्यास सुरुवात करतात, तेव्हा समजून घ्या की रामराज्याच्या पुनर्स्थापनेची वेळ आली आहे. राम राजाने सर्व गोष्टींचा त्याग केला आणि एक तपस्वी जीवन जगण्यास सुरुवात केली होती. हिंदूंची आणि त्यांच्या परंपरांची चेष्टा करणं थांबवा. पृथ्वी आणि स्त्री दोघांनाही शास्त्रांमध्ये आई असा उल्लेख केला आहे. त्यांची पूजा केली जाते. त्यांना एक मौल्यवान संपत्ती आणि अस्तित्वाचे केंद्र मानण्यात काहीच नुकसान नाही.'

kangana alia
'हा सर्वांत मोठा घोटाळा'; विजय आनंद यांचा कोरोनाप्रतिबंधक लस घेण्यास नकार
kangana alia
कन्यादान नव्हे कन्यामान! आलियाच्या जाहिरातीवरुन वाद का?

जाहिरातीत नेमकं काय दाखवलं आहे?

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या जाहिरातीच्या व्हिडीओत आलिया लग्नमंडपात वधूच्या पोशाखामध्ये बसलेली दिसत आहे. कुटुंबातील प्रत्येक सदस्य तिच्यावर किती प्रेम करतो, हे ती सांगत असते. हेच सांगताना ती कन्यादानसंदर्भात प्रश्न उपस्थित करते. "मुलीला परकं धन का म्हटलं जातं? मुली दान करण्याची गोष्ट आहे का? कन्यादान का? त्याऐवजी नवी कल्पना आत्मसात करूया, कन्यामान!" असं ती व्हिडीओच्या शेवटी म्हणते.

जाहिरातीवरून वाद-

आलियाची ही जाहिराती काहींना आवडली. पण काहींना तिने मांडलेले विचार मात्र पटलेले नाहीत. सोशल मीडियावर अनेकांनी आलियावर टीका केली आहे. आलियाने हिंदू धर्माचा अपमान केला, असं काहींनी म्हटलंय. तर प्रत्येक वेळी फक्त हिंदू परंपरांनाच का लक्ष्य केलं जातं असा सवाल काहींनी विचारला आहे. आलिया आणि तिने जाहिरात केलेल्या या ब्रँडवर बंदी आणण्याचीही मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. एकीकडे ट्रिपल तलाकसारख्या प्रथांबद्दल पुरेशी जागरुकता केली जात नाही. पण हिंदू परंपरांबद्दल खूप बोललं जातं, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी राग व्यक्त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com