Kangana Ranaut: ट्विटरवर कंगना इज बॅक! पहिलं ट्विट करत म्हणाली,... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut: ट्विटरवर कंगना इज बॅक! पहिलं ट्विट करत म्हणाली,...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या तिच्या 'इमर्जन्सी' या चित्रपटाबद्दल चर्चेत आहे. कंगना सडेतोड भाष्य करण्यासाठी ओळखली जाते. आज तिच्या चाहत्यांसाठी आंनदाची बातमी आहे. अभिनेत्री कंगना रणौत ट्विटरवर परतली आहे.

हेही वाचा: Shah Rukh Khan: 'पठाण'ची लायकी काढली! शाहरुखनं 'त्याची' बोलतीच बंद केली ..

ट्विटरकडून अभिनेत्री कंगना रणौतचं ट्विटर हँडल स्थगित करण्यात आलं होतं. पण ती आता पुन्हा ती या साइटवर परत आली आहे. ती पुन्हा ट्विटरवर परतली आहे. कंगनाचं जुनं खातं रिस्टोअर करण्यात आले आहे.

हेही वाचा: Rakhi Sawant Video Viral: 'आई आजारी तरी मी 'पठाण'वर रिल बनवणार', राखीची अजब इच्छा

कंगनाने ट्विटर अकाऊंटवर परत येत एक ट्विट केले. ज्यात लिहिलयं, 'सर्वांना नमस्कार, येथे परत आल्याने आनंद झाला.'

हेही वाचा: Shah Rukh Khan Pathaan: पठाणच्या विरोधात उभे राहिले बंगाली, बंगालमध्ये शाहरुखविरोधात पेटला नवा वाद

कंगनाच्या टिमच्या वतीनं हे ट्विट करण्यात आलं आहे. ज्यात ती परत आल्याचे लिहिले आहे. तिच्या या ट्विटवर अनेक सेलिब्रिटींनी त्यांचे अभिनंदन केले असून काही लोकांच्या मजेदार प्रतिक्रियाही येत आहे. तर याचे काही मीम्सही व्हायरल होत आहेत.

कंगनाचं ट्विटर अकाउंट मे 2021 मध्ये, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ' नियमांच वारंवार उल्लंघन केल्याबद्दल तिचं खातं कायमचं निलंबित करण्यात करण्यात आले होते.