Kangana Ranaut: एसएस राजामौलींचं कौतुक करत कंगना नेटकऱ्यांवर भडकली

अभिनेत्रीने एसएस राजामौली यांचा बचाव केला आणि त्यांचे कौतुकही केले. अभिनेत्रीचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
kangana ranaut and ss rajamouli
kangana ranaut and ss rajamouli Sakal

बॉलिवूड अभिनेत्री कंगनाने सोशल मीडियावर कमबॅक केले आहे. ती जवळजवळ प्रत्येक मुद्द्यावर बोलत असते आणि तिचे विधान ती अगदी स्पष्टपणे मांडते. अभिनेत्रीने नुकतीच सोशल मीडियावर उद्धव ठाकरेंवर निशाणा साधत एक पोस्ट लिहिली आहे. तिच्या या पोस्टला चाहते सहमती देताना दिसले.

याशिवाय, अलीकडेच, एका वापरकर्त्याच्या पोस्टवर टिप्पणी करताना, अभिनेत्रीने एसएस राजामौली यांचा बचाव केला आणि त्यांचे कौतुकही केले. अभिनेत्रीचे हे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल होत असून चाहते त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

खरं तर, ट्विटरवर पोस्ट करताना एका यूजरने दक्षिण भारतीय चित्रपट निर्माते एसएस राजामौली यांच्यावर निशाणा साधला आणि लिहिले की- ‘द फाउंटनहेड’ या कादंबरीपासून प्रेरित होऊन एसएस राजामौली म्हणाले की, धर्म हा फसवणुकीसारखा आहे.

यासोबतच युजरने सर्वांना एसएस राजामौली यांचा व्हिडिओही आणि भाषण ऐकण्यास सांगितले. जेव्हा या ट्विटवर कंगनाची नजर पडली तेव्हा ती स्वतःला रोखू शकली नाही. तिने आपल्या वक्तव्यात राजामौलींचा बचाव केला.

kangana ranaut and ss rajamouli
Rakhi Sawant: 'डॉक्टरांचा सल्ला झुगारत त्यानं माझ्यासोबत', गर्भपातासंदर्भात राखीनं फोडलं आदिलच्या नावावर खापरं

यावर प्रतिक्रिया देताना कंगना म्हणाली- "जास्त प्रतिक्रिया देण्याची गरज नाही. नेहमी हातात भगवा झेंडा घेवून मिरण्याची गरज नाही. आपली कृती आपल्या शब्दांपेक्षा जास्त बोलते. अभिमानी हिंदू असूनही आपल्याला सर्व प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे".

"आपल्याला ट्रोलिंगचे शिकार व्हावे लागते आणि याशिवाय आपल्याला नकारात्मकतेतून जावे लागते. पण आम्ही सर्वांसाठी चित्रपट बनवतो. आम्ही कलाकार कमकुवत आणि नाजूक आहोत".

kangana ranaut
kangana ranaut Sakal

कंगना पुढे म्हणाली की, "आम्हाला सो कॉल्ड राइट विंगकडूनही पाठिंबा मिळत नाही. आम्ही स्वतःवर पूर्णपणे अवलंबून आहोत. मी राजामौली सरांविरुद्ध एकही शब्द ऐकू शकत नाही. जे प्रतिभावान आणि देशभक्त आहेत. ते आम्हाला भेटल्यामुळे आम्ही धन्य झालो".

कंगनाने काल रात्री एक ट्विट केले होते ज्यात तिने अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला होता. निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे यांच्या बाजूने घेतलेल्या निर्णयावर तिने ठाकरे यांना टोला लगावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com