
कंगनाचा 'धाकड' ट्रेलर पाहिलात? स्पाय एजंट बनून 7 वेळा दिसली वेशांतर करताना
बॉलीवूडची क्वीन कंगना रणौतचा(Kangana Ranaut) बहुप्रतिक्षित 'धाकड' सिनेमा प्रदर्शनासाठी सज्ज आहे. नुकताच या सिनेमाचा ट्रेलर रीलिज करण्यात आला. सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वी रीलिज केला होता. त्यावेळी कंगनाच्या चाहत्यांना तो भलताच पसंतीस उतरला होता. जसं सिनेमाचं नाव आहे 'धाकड', कंगनाही अगदी त्याच अंदाजात दिसली होती. सिनेमात धमाकेदार अॅक्शन सीन्स करताना कंगना दिसणार आहे. रजनीश राजी घई दिग्दर्शित 'धाकड' सिनेमात कंगना एका स्पाय एजंटच्या भूमिकेत दिसणार आहे. सिनेमात तिचं नाव आहे अग्नी. ट्रेलरमध्ये कंगना खूप वेगवेगळ्या रूपात दिसली अन् ढिशूम ढिशूम अॅक्शनही तिनं केलीय. सिनेमाचा ट्रेलर तुम्हालाही नक्कीच आवडेल.
हेही वाचा: हिंदी भाषा वादात कंगनाची उडी; म्हणाली,'संस्कृतच हवी राष्ट्रीय भाषा कारण...'
ट्रेलरमध्ये कंगना जबरदस्त अॅक्शन करताना दिसत आहे,तर दुसरीकडे खलनायक अर्जुन रामपाल तिला कॉंटे की टक्कर देताना दिसत आहे. अभिनेत्री दिव्या दत्ता देखील ट्रेलमध्ये भाव खाऊन गेली आहे. तिनं एका वेश्येची भूमिका साकारलेली आहे. ट्रेलरमध्ये कंगना दुश्मनांना झोडपताना आणि त्यांच्यावर गोळ्या झाडताना दिसत आहे.
सिनेमात कंगना जासूस बनून वेगवेगळे वेशांतर करताना दिसत आहे. माहितीनुसार,'धाकड' सिनेमात कंगना सात वेगवेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. ट्रेलर पाहिल्यावर आपल्याला ते सातही लूक पहायला मिळतील. राजी घई दिग्दर्शित 'धाकड' सिनेमाची निर्मिती सोहोल मकलईनं केली आहे. प्रेक्षक खूप दिवसांपासून या सिनेमाच्या रिलीजची वाट पाहत आहेत. सुरुवातीला हा सिनेमा ८ एप्रिलला प्रदर्शित होणार होता. पण काही कारणानं याचं प्रदर्शन पुढे ढकललं गेलं आहे. आता कंगनाचा हा सिनेमा २० मे,२०२२ रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
Web Title: Kangana Ranaut Dhaakad Movie Trailer
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..