Kangana Ranaut: 'हा तर शुभशकून..', तेजसच्या प्रमोशनवेळी कंगनाला फ्लाईटमध्ये झाली खास व्यक्तीची भेट

कंगनाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. तिने या भेटीचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत
Kangana Ranaut gets to sit next tp  NSA Ajit Doval On Flight Amid Tejas Promotions
Kangana Ranaut gets to sit next tp NSA Ajit Doval On Flight Amid Tejas PromotionsEsakal

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. कंगनाला बॉलिवूडची पंगा क्विन म्हटले जाते . कंगना ही तिच्या स्पष्टवक्ते शैलीसाठी ओळखली जाते.

कुणावर प्रेम व्यक्त करायचं असेल किंवा कुणावर टिका करायची असेल कंगना कधीच मागे नसते. सध्या कंगना तिच्या आगामी तेजस या सिनेमामुळे चर्चेत आहे. ती तेजस या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

याच दरम्यान कंगना अनेक राजकिय नेत्यांच्या भेटी घेत आहे. आता कंगनाने तिच्या अधिकृत X हँडलवर काही फोटो शेअर केली आहेत, ज्यामध्ये ती एका खास व्यक्तीला भेटली आहे.

Kangana Ranaut gets to sit next tp  NSA Ajit Doval On Flight Amid Tejas Promotions
International Film Festival: 'कांतारा' पासून ते 'द केरळ स्टोरी' पर्यंत हे चित्रपट वाढतील 54 व्या IFFI महोत्सवाची शान!

कंगनाने राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची भेट घेतली आहे. तिने या भेटीचे काही फोटो सोशल मिडियावर शेयर केले आहेत. हे फोटो शेयर करताना कंगनाने सांगितलं की अचानक तिची भेट अजित डोवाल यांच्यासोबत झाली.

कंगनाने लिहिले, 'नशिबाचा काय वेगळाच चमत्कार आहे. आज सकाळी फ्लाइटमध्ये मला अजित डोवाल यांच्या शेजारी बसण्याची संधी मिळाली. 'तेजस'च्या प्रमोशन दरम्यान मला सरांना भेटण्याची संधी मिळाली, जे प्रत्येक सैनिकासाठी प्रेरणास्थान आहेत. मी हा एक शुभ शगुन मानते. जय हिंद.'

Kangana Ranaut gets to sit next tp  NSA Ajit Doval On Flight Amid Tejas Promotions
PM Modi On Salman Khan: हुड हुड दबंग.. शिंदेंच्या किल्ल्यात पीएम मोदींनी केलं सल्लूमियाचं खास स्वागत! व्हिडिओ व्हायरल

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भेटीचे फोटो कंगनाने शेयर केले जे सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.

सध्या कंगना तिच्या तेजस सिनेमाचे जोरदार प्रमोशन करत आहे. यावेळी कंगना आता दिल्लीत लाल किल्ल्याच्या मैदानावर होणार्‍या प्रसिद्ध लवकुश रामलीलामध्ये सहभाग घेणार आहे. यावेळी कंगनाच्या हातून रावण दहन करण्यात येणार आहे.

कंगनाने देखील याविषयी सोशल मिडियावर एक पोस्ट शेयर करुन माहीती दिली. "लाल किल्ल्यावर दरवर्षी आयोजित कार्यक्रमाच्या 50 वर्षांच्या इतिहासात ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी महिला रावणाच्या पुतळ्याचे दहन करेल." असं कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे.

'तेजस'मध्ये कंगना तेजस गिल नावाच्या वायुसेनेच्या पायलटची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट येत्या 27 ऑक्टोबरला थिएटरमध्ये दाखल होणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com