PM Modi On Salman Khan: हुड हुड दबंग.. शिंदेंच्या किल्ल्यात पीएम मोदींनी केलं सल्लूमियाचं खास स्वागत! व्हिडिओ व्हायरल

PM Modi Hud Hud Dabang Video: मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध सिद्धियां स्कूलच्या 125 व्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पीएम मोदींनी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.
PM Modi Hud Hud Dabang Video:
PM Modi Hud Hud Dabang Video:Esakal

PM Modi Hud Hud Dabang Video: बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा त्याच्या आगामी सिनेमा 'टायगर 3' साठी चर्चेत आहे. या चित्रपटाद्वारे सलमान खान आणि कतरिना कैफ पुन्हा चाहत्यांना अॅक्शन अवतारात दिसणार आहे. काही दिवसांपुर्वीच सलमानच्या टायगर 3 या चित्रपटाचा टिझर आणि ट्रेलर रिलिज झाला. सलमानच्या चाहत्यांना या चित्रपटाची आतुरतेने प्रतिक्षा आहे.

PM Modi Hud Hud Dabang Video:
Mallika Sherawat Bday : 'लोकांचं फार मनावर घ्यायचं नसतं'! 5 कोटींच्या कारमधून फिरणारी 'मल्लिका' खऱ्या आयुष्यातही राणीच

आता नुकतच या चित्रपटाचे पहिले गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले जे काही तासातच सोशल मिडियावर व्हायरल झाले. सध्या सलमानच्या टायगर 3चे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. मात्र त्याच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा देखील एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत पीएम मोदी हे सलमान खानबद्दल बोलताना दिसत आहे.

PM Modi Hud Hud Dabang Video:
Dharmendra on Kissing Scene: "माझ्या एका किसिंग सीनने खळबळ...." पुन्हा बोलले धर्मेंद्र

मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरच्या प्रसिद्ध सिद्धियां स्कूलच्या 125 व्या संस्थापक दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात पीएम मोदींनी यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शाळेबद्दल आणि या शाळेत शिकलेल्या काही माजी विद्यार्थ्यांची नाव घेतली.

ऐतिहासिक ग्वाल्हेर किल्ल्यावर बांधलेल्या सिंधिया शाळेच्या या विशेष कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपस्थिती चर्चेत होती.

या व्हिडिओत सलमानचे नाव घेताना पंतप्रधान म्हणतात की, "तुम्हा लोकांना माहित आहे का माझा सिंधिया स्कूलवर इतका विश्वास का आहे? तुमच्या शाळेतील काही माजी विद्यार्थ्यांना मी चांगले ओळखतो. त्यापैकी एक केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आहेत, जे आपल्या सोबत आहेत त्याचबरोबर लेफ्टनंट जनरल मोतीधर, अमीन सयानी ज्यांचा आवाज रेडिओवर आपले मन जिंकतो. ब्रदर्स आणि हुड हुड दबंग सलमान खान. इतकच नाही तर नितेश मुकेश जी माझे मित्र आहेत."

PM Modi Hud Hud Dabang Video:
International Film Festival: 'कांतारा' पासून ते 'द केरळ स्टोरी' पर्यंत हे चित्रपट वाढतील 54 व्या IFFI महोत्सवाची शान!

मात्र जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलमान खानच्या नावाचा उल्लेख केला तेव्हा तेथील विद्यार्थी आणि इतर लोकांनी शिट्ट्याआणि टाळ्या वाजवल्या. त्यामुळे हा व्हिडिओ जास्त चर्चेत आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com