
Sidharth - Kiara Wedding: सिद्धार्थ - कियाराला आशीर्वाद देताना कंगनाला आठवलं तिचं बॉलिवूडमधल प्रेम, म्हणाली...
Sidharth - Kiara Wedding: सिद्धार्थ - कियाराच्या लग्नाचे वेध आता सर्वांना लागले आहेत. बॉलिवूड मधली हि गोड जोडी येत्या ६ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकणार अशी चर्चा आहे. सिद्धार्थ कियाराच्या लग्नासाठी अनेक बॉलिवूड कलाकार हजेरी लावणार असं दिसतंय. अशातच सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत असलेली अभिनेत्री कंगना रणौत सिद्धार्थ - कियाराबद्दल जरा चांगलंच बोलली.

लग्नाआधी कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर सिद्धार्थ - कियाराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांना खास शब्दात आशीर्वाद दिले आहेत. कंगना म्हणाली, "हे जोडपे किती आनंददायी आहे... या चित्रपटसृष्टीत आपल्याला खरे प्रेम क्वचितच दिसते... या दोघांना एकत्र पाहणं खूप छान असतं" अशी पोस्ट लिहून कंगनाने या दोघांसाठी प्रेम दर्शवल आहे.
काही वर्षांपूर्वी कंगना अभिनेता हृतिक रोशनला डेट करत असल्याची जोरदार चर्चा सुरु झाली होती. क्रिश ३ च्या सिनेमावर या दोघांचं प्रेम जुळलं अशा चर्चा सुरु झालेल्या. दोघांचा एका पार्टीतला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेला. परंतु हृतिकने या सर्व गोष्टी नाकारला. व्हायरल झालेला फोटो हा एडिट केलेला आहे त्याच्याशी माझा काही संबंध नाही, असं हृतिक म्हणाला. त्यामुळे सिद्धार्थ - कियारा निमित्ताने कंगनाला तीच जुनं प्रेम आठवलं असावं
कियारा आणि सिद्धार्थची लव्हस्टोरी सुरु झाली 'शेरशाह' सिनेमाच्या सेटवर. शेरशाह सिनेमाच्या सेटवर सिद्धार्थ आणि कियारा यांचं नातं मैत्रीच्या पलीकडे आणि प्रेमाच्या अलीकडे गेलं. दोघे रिलेशनशिप मध्ये आले अशा चर्चा सुरु झाल्या. पण सिद्धार्थ - कियारा यांनी त्यांचं रिलेशनशिप कधी उघडपणे सांगितलं नाही किंवा कधी नाकारलही नाही.
सिध्दार्थ - कियारा हे दोघे ६ फेब्रुवारीला राजस्थानच्या जैसलमेर भागातील सुर्यगढ पॅलेस मध्ये लग्न करणार आहेत. दोघांच्या लग्नसाठी खास सिक्युरिटी असणार आहे. या सिक्युरिटीची जबाबदारी शाहरुख खानचा आधीचा बॉडिगार्ड यासीन खान कडे असणार आहे. यासीन सुर्यगढ पॅलेस मध्ये कियारा - सिद्धार्थच्या लग्नासाठी कडक सुरक्षा तैनात करणार आहे.
कंगनाच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झालं तर.. कंगना इमर्जंसी या आगामी सिनेमात झळकणार आहे. या सिनेमात कंगना इंदिरा गांधींची भूमिका साकारणार आहे. विशेष गोष्ट म्हणजे कंगनाने हा सिनेमा दिग्दर्शित केलाय. २० ऑक्टोबर २०२३ ला हा सिनेमा रिलीज होणार आहे.