Honar Sun Mi Hya Gharchi: काहीही हा श्री.. जान्हवी - श्री तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिसणार.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honar Sun Mi Hya Gharchi, tejashri pradhan, shashank ketkar

Honar Sun Mi Hya Gharchi: काहीही हा श्री.. जान्हवी - श्री तब्बल ७ वर्षांनी पुन्हा एकदा दिसणार..

Honar Sun Mi Hya Gharchi: झी मराठी वर याआधी अनेक मालिका होऊन गेल्या ज्या प्रेक्षकांच्या जगण्याचा भाग झाल्या आहेत. या मालिकांवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं. झी मराठीवर अशीच एक लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे होणार सून मी ह्या घरची. काहीही हा श्री म्हणत होणार सून मी ह्या घरची हि मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. त्यामुळे फॅन्सना खूप आनंद झालाय.

होणार मी सून ह्या घरची हि मालिका पुन्हा एकदा टीव्ही वर दिसणार आहे. तुम्हाला वाटलं असेल कि या मालिकेचा दुसरा सिझन येतोय तर असं नाही.. होणार सून मी ह्या घरची मालिका पुन्हा एकदा झी मराठीवर दिसणार आहे. १३ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ४ वाजता हि मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे झी मराठीवर गाजलेली हि सुपरहिट मालिका पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

होणार सून मी ह्या घरची मालिकेबरोबर झी मराठीवरील आणखी एक मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतेय ती मालिका म्हणजे का रे दुरावा. सुयश टिळक आणि सुरुची अडारकर या जोडीची लोकप्रिय मालिका का रे दुरावा सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. १३ फेब्रुवारीपासून संध्याकाळी ५ वाजता हि मालिका झी मराठीवर दिसणार आहे. अशाप्रकारे झी मराठीवरच्या गाजलेल्या या २ मालिका पुन्हा एकदा रसिकांना पाहायला मिळणार आहेत.

होणार सून मी या घरची मालिकेत शशांक केतकर आणि तेजश्री प्रधान यांची जोडी कमालीची लोकप्रिय ठरली. याच मालिकेच्या सेटवर दोघांचं प्रेम जुळलं. आणि पुढे दोघांनी लग्न केलं. पण काही व्यक्तिगत कारणामुळे या दोघांचं नातं बिनसलं. आणि पुढे दोघांनी घटस्फोट घेतला. आजही प्रेक्षक या श्री - जान्हवी वर तितकंच प्रेम करतात. या मालिकेत रोहिणी हट्टंगडी, प्रसाद ओक, लीना भागवत असे अनेक दिग्गज कलाकार होते. तर दुसरीकडे का रे दुरावा मालिका सुद्धा लोकप्रिय झाली. सुयश सुरुची सोबतच अरुण नलावडे, सुबोध भावे असे अनेक कलाकार या मालिकेत झळकले