Kangana Ranaut च्या 'लॉकअप 2' ला लागला ब्रेक.. 'हे' कारण पुढे करत एकता कपूरनं चाहत्यांना दिला झटका

कंगना रनौतचा लॉकअप 2 विषयीची एक बातमी सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे ज्यामध्ये सध्या तरी शो चाहत्यांच्या भेटीस येणार नाही असं म्हटलं गेलं आहे.
Kangana Ranaut
Kangana RanautEsakal

Kangana Ranaut: टी.व्ही क्वीन एकता कपूरचा वादग्रस्त रिअॅलिटी शो 'लॉकअप सीझन २' सुरू होण्याआधीच चर्चेत आहे. या शो ला कंगना रनौत होस्ट करणार आहे आणि एकता कपूर आपल्या या रिअॅलिटी शो ला ग्रॅन्ड बनवण्यासाठी शक्य होईल ते प्रयत्न करताना दिसत आहे. आतापर्यंत या शो साठी 'बिग बॉस १६' मधील स्पर्धकांपासून टी.व्ही च्या अनेक बड्या कलाकारांना संपर्क साधण्यात आला आहे.

एवढंच नाही तर कितीतरी सेलिब्रिटींना शो साठी कन्फर्म केल्याचं देखील कळत आहे. पण या दरम्यान 'लॉकअप २' शी संबंधित एक मोठी बातमी समोर आली आहे,जी चाहत्यांसाठी एका मोठ्या झटक्यापेक्षा कमी नाही. दावा केला जातोय की कंगना रनौतच्या या रिअॅलिटी शो ला पुढे ढकलण्यात आलं आहे. (Kangana Ranaut Lock Upp 2 Postponed..read reason)

Kangana Ranaut
Priyanka Chopra: 'म्हणून मी वॉशरुममध्ये जाऊन लंच करायचे..', अमेरिकेतील दिवसांविषयी प्रियंकाचा खळबळजनक खुलासा

सोशल मीडियावर 'लॉकअप सीझन २' खूप लाइमलाइटमध्ये आला आहे. आता प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे की हा शो कधीपासून सुरू होणार आहे. पण या दरम्यान रिअॅलिटा शो ला फॉलो करणाऱ्या एका फॅन पेजने 'लॉकअप २' हा शो पोस्टपोन करण्यात आल्याची माहिती चाहत्यांना दिली आहे.

एकता कपूर अजूनही चॅनलशी डील करत आहे. शो साठी सेलिब्रिटींना संपर्क केला जात आहे. पण काहीतरी इंटरनॅशनल इश्यू आहे त्याकारणानं शो पुढे ढकलला गेल्याचं कळत आहे.

Kangana Ranaut
Charu Asopa: 'मी सिंगल मदर आहे म्हणून लोक..', सुश्मिता सेनच्या वहिनीचा खुलासा हैराण करून सोडेल..

एकता कपूरला 'लॉकअप २' हा आपला रिअॅलिटी शो ग्रॅंड बनवायचा आहे,त्याच्या तयारीत ती सध्या बिझी आहे. या शो चा पहिला सीझन ओटीटी वर स्ट्रीम झाला होता,ज्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता आणि याच कारणानं एकताला या शो चा दुसरा सीझन टी.व्ही वर आणायचा आहे. एवढंच नाही तर सीझन २ साठी टी.व्ही वरील मोठ्या चेहऱ्यांना संपर्क केला जातोय ज्यात करण पटेल,दिव्या अग्रवाल,राखी सावंत,उर्फी जावेद,असिम रियाझ आणि इतरही अनेकांच्या नावाची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com