Charu Asopa: 'मी सिंगल मदर आहे म्हणून लोक..', सुश्मिता सेनच्या वहिनीचा खुलासा हैराण करून सोडेल..

चारू असोपा गेल्या वर्षभरापासून आपला पती म्हणजेच सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याच्यापासून वेगळी राहत आहे.
Charu Asopa
Charu Asopa Esakal

Charu Asopa: 'मेरे अंगने मे फेम' अभिनेत्री चारू असोपा रोज कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. ती तिची मुलगी जियाना सोबत एकटी राहते आणि यादरम्यान अभिनेत्रीनं राहण्यासाठी घर शोधताना तिला किती अडचणींचा त्रास सहन करावा लागला याविषयी खुलासा केला आहे.

चारूच्या भाड्याच्या घराचा शोध भले संपला असेल तरी अभिनेत्रीनं मुंबईत घर शोधताना आलेल्या अडचणींचा पाढा नुकताच एका मुलाखतील वाचला आहे. चारु आतापर्यंत १ बीएचके फ्लॅटमध्ये राहत होती,आता नुकतीच ती २ बीएचके फ्लॅटमध्ये शिफ्ट झाली आहे.

तिनं एका मुलाखतीत सांगितलं की,''मुंबईमध्ये एक घर शोधण्यापासून ते तिथे शिफ्ट होईपर्यंतचा माझा प्रवास खडतर होता. मी एकापाठोपाठ एक घर शोधत होते आणि तेव्हा माझ्यासोबत खूपच सगळं विचित्र घडत होतं. रोज मी घर शोधायला बाहेर जायचे आणि ते त्रासदायक ठरत होतं''.(Charu Asopa Faces issues in finding new flat with daughter ziana know the reason)

Charu Asopa
Pooja Hegde:'कुण्या गावाची..कोणच्या नावाची..कुण्या राजाची तू गं रानी'

चारू असोपानं ईटाईम्सला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, ''माझ्यासाठी घर शोधणं सोपं नव्हतं कारण मी एक अभिनेत्री आहे आणि त्यात सिंगल मदर आहे''.

माहितीसाठी सांगतो की गेल्या वर्षभरापासून चारू असोपा आपला पती आणि सुश्मिता सेनचा भाऊ राजीव सेन याच्यापासून वेगळी राहत आहे. त्यांना एक मुलगी आहे जियाना..जी आता दीड वर्षाची आहे.

चारु म्हणाली,''दोन गोष्टी घर शोधताना माझ्या मार्गात अडसर करत होत्या. एक मी अभिनेत्री आहे आणि दुसरी सिंगल मदर''. मुंबईत एका कलाकाराला घर नाही मिळणार तर मग कुठे मिळणार? असा सवालही चारूनं केला आहे.

चारुनं खुलासा करत म्हटलं की,''मी या सगळ्या अडणींचा सामना फक्त मी सिंगल मदर आहे म्हणून केला आहे. मला एक फ्लॅट आवडला पण ते लोक खूप विचित्र होते. जेव्हा त्यांना कळलं की मी एक सिंगल मदर आहे आणि माझ्या मुलीसोबत एकटी राहते,ही गोष्ट त्यांना पटली नाही''. चारूनं घर आपल्या मुलीसाठी बदललं असं ती म्हणाली. ती मोठी होतेय आणि त्यामुळे तीला मोठ्या घराची गरज लागेल असं चारू म्हणाली.

Charu Asopa
Priyanka Chopra: 'म्हणून मी वॉशरुममध्ये जाऊन लंच करायचे..', अमेरिकेतील दिवसांविषयी प्रियंकाचा खळबळजनक खुलासा
Charu Asopa
Kapil Sharma Show मध्ये इतकं तगडं मानधन देऊन परत आणलंय कृष्ण अभिषेकला.. या पैशावरनंच बिघडलेल्या गोष्टी

चारू पुढे म्हणाली, ''हे खूप छोटंसं घर आहे. मी 1 बीएचके मध्ये राहते. आधी मला वाटत होतं की हे जियानासाठी परफेक्ट आहे. पण आता जियाना चालायला लागली आहे..ती पायाखाली काय आहे हे न पाहता धावत सुटते.यामुळे तिला दुखापत होईल अशी सारखी भीती माझ्या मनात लागून राहते. मी काही खूप मोठ्या घरात शिफ्ट नाही होत आहे,पण कमीत कमी २ बीएचके,जिथे एक तिच्यासाठी खेळायला वेगळी खोली असेल असं घर मी शोधलं''.

मुलाखतीत चारूनं सिंगल मदर असल्यावर रिवलिंग कपडे घातले की कशा कशा नजरांचा सामना करावा लागतो याविषयी देखील बातचीत केली आहे. ती म्हणाली,''लोक घाणेरड्या कमेंट्स करतात,ज्यामुळे आपण हैराण होतो हे जाणून की लोकांची मानसिकता किती खालच्या दर्जाला घसरू शकते''.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com