Lock Upp: प्रेग्नंसीबाबत पायल रोहतगीचा धक्कादायक खुलासा, 'नवऱ्याला तेव्हाच...' |Tv Entertainment News Lock Upp Kanagana Show | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Payal Rohtagi

Lock Upp: प्रेग्नंसीबाबत पायल रोहतगीचा धक्कादायक खुलासा, 'नवऱ्याला तेव्हाच...'

Tv Entertainment: अभिनेत्री कंगनाचा (Kangana Ranaut) लॉक अप नावाचा शो सध्या (Lock Upp) मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे. कंगनाच्या लॉकबाबत वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या. हा शो जास्त काळ टिकणार नाही असेही बोलले जाऊ लागले होते. त्यामध्ये मनोरंजन विश्वातील अनेक सेलिब्रेटींचा समावेश (Entertainment News) होता. आता मात्र कंगनाच्या ल़ॉक अपनं सध्याच्या घड़ीला सर्वाधिक लोकप्रिय शो होण्याचा मान मिळवला आहे. देशातील सर्वात वादग्रस्त सेलिब्रेटी असणाऱ्या (bollywood news) व्यक्तींनी एकत्र करुन प्रेक्षकांना धक्के देण्याचे काम कंगनाच्या या शो नं केलं आहे. आता लॉक अपमधील एका प्रसिद्ध सेलिब्रेटीनं धक्कादायक खुलाशानं प्रेक्षकांना आश्चर्य वाटले आहे. त्या सेलिब्रेटीचे नाव पायल रोहतगी असून तिनं प्रेग्नंसीबाबत खळबळजनक विधान केलं आहे.

आपल्या बोल्ड अन् वादग्रस्त वक्तव्यासाठी ओळखली जाणारी सेलिब्रेटी म्हणजे पायल रोहतगी. सोशल मीडियावर तिचा फॉलोअर्सही मोठा आहे. इंस्टावरही फॅन फॉलोइंग लिस्ट मोठ्या असणाऱ्या पायलनं आजवर अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. तिच्या त्या वक्तव्यानं सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यात आले आहे. लॉक अपमध्ये सहभागी झाल्यानंतर पायलनं वेगवेगळ्या प्रकारचे खुलासे करुन नेटकऱ्यांना धक्के दिले आहेत. कंगनाच्या लॉक अप नावाच्या रियॅलिटी शो मध्ये स्वताचे स्थान निर्माण करण्यासाठी सहभागी स्पर्धकानं त्याच्या आयुष्याशी संबंधित सर्वात मोठा धक्कादायक खुलासा कऱणं गरजेचं आहे. त्यानुसार सायशा शिंदे, मुनव्वर फारुख, तेहसीन पुनावाला यांच्या खुलाशानं ल़ॉक अपची रंगत आणखी वाढली आहे.

कंगनानं पायलला धक्कादायक वक्तव्य करण्यास सांगितले तेव्हा तिनं प्रेग्नंसीबाबत खुलासा केला आहे. त्यामध्ये ती म्हणते, मी अनेकदा प्रेग्नंसीबाबत प्रयत्न केले होते. त्यात मला अपयश आले होते. मी माझ्या नवऱ्याला सांगितले होते की, तू दुसरं लग्न कर जेणेकरुन तुला परिवाराची भरभराट करता येईल. सोशल मी़डियावर कंगनाच्या लॉक अप शोचा आगामी एपिसोडचा प्रिव्ह्यु प्रदर्शित झाला आहे. त्याला नेटकऱ्यांकड़ून प्रतिसाद मिळताना दिसतो आहे. आपण त्याचवेळी एग्ज फ्रोजन प्रक्रिया करुन आई होऊ शकते हे सिद्ध केलं असतं तर आणखी मनस्ताप टाळता आला असता. असंही पुनमनं यावेळी सांगितलं.