ट्वीटरवर कंगना विरोधात वीर दास रंगला वाद;वाचा सविस्तर

अभिनेत्रीच्या 'लॉकअप' शो संदर्भात अभिनेत्यानं केलं मोठं वक्तव्य
Kangana Ranaut, Vir Das
Kangana Ranaut, Vir DasGoogle

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत (Kangana Ranaut) एकता कपूरच्या 'लॉकअप' या रिअॅलिटी शो ला होस्ट करताना आपल्याला दिसणार आहे. हा शो एएलटी बालाजी आणि एमएक्स प्लेअर या ओटीटी प्लॅटफॉर्म वर दिसणार आहे. १०० दिवस तब्बल १६ स्पर्धक या 'लॉकअप' मध्ये राहणार आहेत. ज्यांना तिथे फार लक्झुरियस सुविधा तर नसतीलच पण इतरही नेहमीच्या काही सुविधांपासून त्या स्पर्धकांना दूर ठेवलं जाणार आहे. यातच आता चर्चा सुरू आहे ती या 'लॉकअप' मध्ये येणारे १६ जण कोण असतील यावरून.

Kangana Ranaut, Vir Das
केवळ 'भीम' म्हणूनच नाही तर प्रविण कुमार 'या' कामगिरीमुळेही ओळखले जायचे

काही दिवसांपूर्वी अफवा होती की कंगना रनौत च्या या 'लॉकअप' मध्ये विनोदी अभिनेता वीर दास दिसणार आहे याची. पण आता दस्तुरखुद्द वीर दासने या चर्चांवर पूर्णविराम लावला आहे. त्याचबरोबर त्यानं कंगनासाठी मोठं वक्तव्य केलं आहे. वीर दासने सोशल मीडियावर कंगनाच्या शो मध्ये सामिल होण्याच्या अफवांचं खंडन करताना ट्वीटरवर एक ट्वीट करत आपलं उत्तर नोंदवलं आहे. त्याने त्या अफवेसंदर्भातील एका बातमीला शेअर करीत ट्वीट केलं आहे की,''माहीत नाही पत्रकार कोण आहे ते. किंवा पत्रकारिता अजूनही शिल्लक आहे का यावरही मला प्रश्न आहेच मनात. पण मी माझ्यावतीने इथे स्पष्ट करू इच्छितो की मला या शो साठी कधीच संपर्क केला गेला नाही आणि अशा कोणत्या शो मध्ये सामिल होण्यात मला इंटरेस्टही नाही. कंगना आणि त्यांच्या टीमला लॉकअप शो साठी शुभेच्छा''. आता कंगना वीर दासच्या विरोधात काय टीवटीव करते ते पहायचं.

Actor Vir Das Tweet Image
Actor Vir Das Tweet ImageTwitter

सोशल मीडियावर वीर दासचे हे ट्वीट जोरदार व्हायरल होत आहे. वीर दासचे चाहते आणि इतर नेटकरीही त्याच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देत आहेत. कंगना या 'लॉकअप' रिअॅलिटी शो च्या निमित्तानं सूत्रसंचालनाच्या विश्वात पदार्पण करीत आहे. या शो ची निर्माती एकता कपूर आहे. २७ फेब्रुवारीपासून हा शो ओटीटी प्लॅटफॉर्मवर दाखवला जाणार आहे. या शो मधील पहिल्या स्पर्धकाचं नाव नुकतंच एका पत्रकार परिषदेत जाहिर केलं होतं. पूनम पांडे ही पहिली स्पर्धक असणार आहे. कंगना आणि पूनम ही दोन नावं शो शी जोडली गेल्यानं लॉकअप विषयी आता चाहत्यांच्या मनात उत्सुकता वाढलेली दिसून येत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com