आपणच आपल्याला... 

वृत्तसंस्था
शनिवार, 25 मार्च 2017

कंगना राणावत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे; पण आता तिच्याविषयी एक वेगळीच चर्चा आहे. ती म्हणजे कंगनाने स्वतःला दिलेली भेटवस्तू. तिच्या 30व्या वाढदिवसानिमित्त कंगनाने तिच्यासाठी मुंबईतील खार येथे 30 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केलाय. या बंगल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बंगल्याचे छत कौलारू आणि जमीन दगडासारखी तिने बनवली आहे. जेणेकरून तिला तिच्या मनालीच्या घरीच राहिल्यासारखे वाटेल. तिचा हा बंगला आहे तीन मजली आणि खास शबनम गुप्ता या इंटिरिअर डिझायनरकडून तिने हा बंगला सजवून घेतलाय. या बंगल्यात तिचे स्वतःचे ऑफिसही असणार आहे.

कंगना राणावत गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या वेगवेगळ्या वक्तव्यांमुळे चर्चेत आहे; पण आता तिच्याविषयी एक वेगळीच चर्चा आहे. ती म्हणजे कंगनाने स्वतःला दिलेली भेटवस्तू. तिच्या 30व्या वाढदिवसानिमित्त कंगनाने तिच्यासाठी मुंबईतील खार येथे 30 कोटी रुपयांचा बंगला खरेदी केलाय. या बंगल्याचे वैशिष्ट्य म्हणजे या बंगल्याचे छत कौलारू आणि जमीन दगडासारखी तिने बनवली आहे. जेणेकरून तिला तिच्या मनालीच्या घरीच राहिल्यासारखे वाटेल. तिचा हा बंगला आहे तीन मजली आणि खास शबनम गुप्ता या इंटिरिअर डिझायनरकडून तिने हा बंगला सजवून घेतलाय. या बंगल्यात तिचे स्वतःचे ऑफिसही असणार आहे. सगळ्यांना वाढदिवसाला दुसऱ्यांकडून भेटवस्तू मिळालेल्या आवडतात; पण कंगना याबाबतीतही स्वाभिमानी आहे. तिला कोणाकडूनही भेटवस्तू नकोय. म्हणून तिने स्वतःच स्वतःसाठी भेटवस्तू खरेदी केलीय. यावरून अनुराधा पाटील यांची आपणच आपल्याला ही कविता आठवली सहजच... 

Web Title: kangana ranaut new home