esakal | 'तिसरं मूल जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा'; वाढत्या लोकसंख्येबाबत कंगनाचं ट्विट

बोलून बातमी शोधा

kangana ranaut
'तिसरं मूल जन्मास घालणाऱ्यांना तुरुंगात डांबा'; वाढत्या लोकसंख्येबाबत कंगनाचं ट्विट
sakal_logo
By
स्वाती वेमूल

सोशल मीडियावर बेधडक आणि परखड मतं मांडणारी अभिनेत्री कंगना राणावत पुन्हा एकदा तिच्या ट्विटमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने भारतातील वाढत्या लोकसंख्येबाबत नुकतंच ट्विट केलं असून यामुळे ती चर्चेत आली आहे. देशातील वाढत्या लोकसंख्येला आळा घालण्यासाठी कठोर पाऊलं उचलली पाहिजेत, असं मत तिने मांडलं. त्याचसोबत तिसरं मूल जन्मास घालणाऱ्यांना दंड ठोठावलं पाहिजे किंवा त्यांना तुरुंगात डांबा, असं तिने ट्विटमध्ये म्हटलं आहे. कंगनाने तिच्या या ट्विटमध्ये दिवंगत माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांचाही उल्लेख केला.

काय म्हणाली कंगना?

'वाढती लोकसंख्या रोखण्यासाठी कठोर कायद्याची गरज आहे. मतांचं राजकारण खूप झालं. हे खरं आहे की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बळजबरीने लोकांची नसबंदी केली आणि त्यामुळे त्यांचा निवडणुकीत पराभव झाला. नंतर त्यांची हत्याही करण्यात आली. पण आज भारतासमोर वाढती लोकसंख्या हे मोठं आव्हान आहे. त्याला आळा घालण्यासाठी कठोर कायदे लागू करायला हवेत. तिसरं मूल जन्मास घालणाऱ्यांना दंड किंवा कारावासाची शिक्षा देण्यात यावी', असं ट्विट कंगनाने केलं.

हेही वाचा : सेलिब्रिटींच्या 'मालदिव व्हेकेशन'वर शोभा डे संतापल्या

हेही वाचा : 'खरंच सुन्न व्हायला झालंय'; हेमांगी कवी परिस्थितीसमोर हतबल

कंगनाच्या या ट्विटवर नेटकऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काहींनी तिच्या मताशी सहमती दर्शविली तर काहींनी तिला ट्रोलसुद्धा केलं.