'ओले..ओले..Shoo..'- राहुल गांधींचे नाव ऐकल्यावर हे काय बोलून गेली कंगना..ट्वीटरवर खळबळKangana Ranaut on Rahul gandhi And Congress | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut on Rahul gandhi And Congress

Kangana Ranaut: 'ओले..ओले..Shoo..'- राहुल गांधींचे नाव ऐकल्यावर हे काय बोलून गेली कंगना..ट्वीटरवर खळबळ

Kangana Ranaut: कंगना रनौत कधी आपल्या सिनेमांमुळे तर कधी आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. नुकताच तिनं ट्वीटरवर आपल्या चाहत्यांशी संवाद साधत Ask Kangana नावाचं सेशन घेतलं होतं. सध्या या सेशनमुळे सगळीकडे कंगनाचीच हवा आहे.

सेशन दरम्यान कंगना रनौतला सिनेमा संबंधितच नाही तर काही राजकीय मुद्द्यांवर देखील प्रश्न विचारले गेले ज्याची उत्तरंही तिनं बिनधास्त अंदाजात दिली आहेत.

या सेशन दरम्यान एका नेटकऱ्यानं कंगनाला राहुल गांधी आणि कॉंग्रेस संबंधित प्रश्न केला. नेटकऱ्यानं लिहिलं की,'जेव्हा तुम्ही राहुल गांधी आणि कॉंग्रेस संबंधी कोणाला बोलताना ऐकता तेव्हा काय विचार तुमच्या मनात येतो?'

तेव्हा कंगनानं कॉंग्रेस आणि राहुल गांधी यांची खिल्ली उडवत लिहिलं,''ओले..ओले..Shooo shoo shweet''.(Kangana Ranaut on twitter in ask kangana session comment on rahul gandhi question)

या सेशन दरम्यान एका नेटकऱ्यानं कंगनाला म्हटलं की,'भविष्यात तू एक रोमॅंटिक सिनेमा लिही आणि स्वतः दिग्दर्शित कर. मला ठाम वाटतं की तो सिनेमा सुपरहिट राहिल. चांगल्या रोमॅंटिक सिनेमांची सध्या कमी आहे'.

त्या नेटकऱ्याच्या प्रश्नावर कंगना म्हणाली..''हो ..हा विषय माझ्या बकेटलिस्टमध्ये आहे''.

एका नेटकऱ्यानं कंगना रनौतला प्रश्न विचारताना तिची सगळ्यात मोठी ताकद आणि कमजोरी विषयी प्रश्न केला.

तेव्हा कंगना म्हणाली, ''माझं साहस माझी ताकद आहे तर कमजोरी मी जवळ बाळगतच नाही. पण माझा राग माझ्यातील निगेटिव्ह पॉइंट असू शकतो''.

सध्या कंगना रनौत तिच्या आगामी 'चंद्रमुखी' सिनेमाच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. तिनं सिनेमाच्या सेटवरच लंच ब्रेकच्या दरम्यान पहिल्यांदा ASK Kangana सेशन घेतलं होतं.

'चंद्रमुखी' व्यतिरिक्त कंगना गेल्या काही दिवसांपासून आपल्या बहुचर्चित 'इमरजन्सी' सिनेमामुळे चर्चेत आहे. हा सिनेमा २० ऑक्टोबर रोजी रिलीज होणार आहे.

या सिनेमात ती माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमात तिच्या व्यतिरिक्त महिमा चौधरी,मिलिंद सोमण,अनुपम खेर असे कलाकार आहेत. कंगना या सिनेमाचं दिग्दर्शन देखील करत आहे.