esakal | सुनील गावस्कर वादात कंगनाने साधला अनुष्कावर निशाणा, 'जेव्हा मला शिव्या दिल्या गेल्या तेव्हा ती...'
sakal

बोलून बातमी शोधा

kangana slams anushka

अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सुनील गावस्कर यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता या प्रकरणात कंगना रणौतने अनुष्का शर्मावर निशाणा साधत तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

सुनील गावस्कर वादात कंगनाने साधला अनुष्कावर निशाणा, 'जेव्हा मला शिव्या दिल्या गेल्या तेव्हा ती...'

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई- भारताचे माजी कॅप्टन सुनील गावस्कर यांनी विराट कोहलीच्या खराब परफॉर्मन्सवरुन अनुष्का शर्मावर कमेंट केली होती. या कमेंटनंतर त्यांना मोठ्या प्रमाणावर टिकेला सामोरं जावं लागलं होतं. अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून सुनील गावस्कर यांना सडेतोड उत्तर दिलं होतं. आता या प्रकरणात कंगना रणौतने अनुष्का शर्मावर निशाणा साधत तिची प्रतिक्रिया दिली आहे. 

हे ही वाचा: सात वर्षांपासून 'या' आजाराने ग्रस्त होती सोनम कपूर, व्हिडिओ पोस्ट करत स्वतःच केला खुलासा  

कंगनाने ट्विट करत म्हटलंय, 'अनुष्का शर्मा तेव्हा गप्प होती जेव्हा मला धमकावलं गेलं आणि हरामखोर म्हटलं गेलं. आज तशाच काहीश्या प्रकाराचा तिला सामना करावा लागला. मी या गोष्टीचा निषेध करते की सुनील गावस्कर यांनी तिला क्रिकेटमध्ये ओढलं मात्र केवळ काही गोष्टींवरच स्त्रीवादी दाखवणं देखील योग्य नाहीये.'

अनुष्काने शर्माने काय लिहिलं होत?

'मिस्टर गावस्कर, तुमची ही कमेंट अजिबात आवडली नाही. मी तुम्हाला उत्तर देऊ इच्छिते. तुम्ही माझ्या पतीसोबत कटाक्षाने माझं नावही घेतलंय. मला हे माहित आहे की तुम्ही कित्येक वर्षांपासून क्रिकेटर्सच्या वैयक्तिक आयुष्याचा आदर करत आला आहात. तुम्हाला नाही वाटत का की आम्हीपण यासाठी पात्र आहोत. तुम्ही वेगळ्या शब्दात देखील माझ्या पतीवर निशाणा साधू शकत होतात. मात्र तुम्ही माझ्या नाव यात ओढून आणलं हे योग्य आहे का? हे २०२० पासून सुरु आहे मात्र माझ्यासाठी आजही या गोष्टी माझ्याकडून दुर्लक्षित झालेल्या नाहीत. मला नेहमी क्रिकेटमध्ये ओढलं जातं. मी तुमचा खुप आदर करते. तुम्ही या खेळात महान आहात. मी तुम्हाला केवळ एवढंच सांगू इच्छिते की तुम्ही हे समजू शकता जेव्हा यात माझं नाव ओढलं गेलं असेल तेव्हा मला कसं वाटलं असेल?'   

kangana ranaut slams anushka sharma over sunil gavaskar controversial comment  

loading image
go to top