Kangana Ranaut चा खळबळजनक खुलासा..म्हणाली,'रात्री हिरोच्या रुममध्ये जाण्यास मी तेव्हा नकार दिला म्हणून..', Kangana Ranaut Tweet | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kangana Ranaut

Kangana Ranaut चा खळबळजनक खुलासा..म्हणाली,'रात्री हिरोच्या रुममध्ये जाण्यास मी तेव्हा नकार दिला म्हणून..',

Kangana Ranaut: बॉलीवूड अभिनेत्री कंगना रनौत नेहमीच तिच्या ट्वीटमुळे चर्चेत असलेली पहायला मिळते. आणि अनेकदा ती आपल्या पोस्टच्या माध्यमातून बॉलीवूडला टार्गेट करत आली आहे.

कंगनानं नुकतीच आपल्या आईविषयी पोस्ट केली होती. ती पोस्ट भलतीच व्हायरल झाली होती. अनेकांनी तिच्या त्या पोस्टचं कौतूकही केलं होतं. आता एका व्यक्तीनं कंगनाच्या या ट्वीटवर कमेंट करत म्हटलं आहे की,'इतक्या श्रीमंत मुलीची आई असूनही शेती करते. असा साधेपणा कुठे पहायला मिळेल'.

यावर कंगना रनोतनं स्पष्टिकरण दिलं आहे आणि बोलता बोलता पुन्हा बॉलीवूडला टार्गेट केलं आहे. (Kangana Ranaut target bollywood actress post on social media share controvesial incident)

कंगनानं ट्वीट करत लिहिलं आहे की-''कृपया हे लक्षात घ्या की माझी आई माझ्यामुळे श्रीमंत नाही झाली. मी एका राजकीय,व्यावसायिक, उत्तम नोकरदार घराण्यातून आले आहे. माझी आई गेल्या २५ वर्षांपासून एक शिक्षिका आहे. फिल्म माफियांना याविषयी माहिती असायला हवं की माझ्यात इतका आत्मसम्मान कुठून आला. का मी त्यांच्यासारखं खालच्या दर्जाच्या हरकती करत नाही किंवा कोणत्या लग्नात नाचून पैसे कमावत नाही''.

यानंतर कंगनानं पुढे लिहिलं आहे की-''भिकाऱ्या फिल्म माफिया लोकांनी माझ्या आत्मसम्मानाला अहंकार म्हणत हिणवलं. कारण मी दुसऱ्या मुलींसारखं गॉसिप करत नाही, आयटम सॉंग नाकारते,रात्री हिरोच्या रुममध्ये जाण्यास स्पष्ट नकार दिला..''

''आणि यासगळ्यानंतर या लोकांनी मला वेडी म्हणून घोषित केलं..मला जेल पाठवण्याचा देखील प्लॅन केला. ही कसली मुजोरी आहे. स्वतःला सुधरायचं सोडून मला सुधरायला निघालेत''.

'' पण गोष्ट अशी आहे की मला स्वतःसाठी काही नकोय. मी आता माझी सगळी संपत्ती गहाण ठेवून एक सिनेमा बनवला. राक्षसांचा एका फटक्यात मी सर्वनाश करणार आणि कोणीही मला दोष देणार नाही''.

हेही वाचा: डिजिटल लोन्स विषयी सर्वकाही

ट्वीटरवर लोकांनी कंगनाच्या या पोस्टवर रिअॅक्शन दिल्या आहेत. काही लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत तर काही लोक तिला तिच्या जुन्या दिवसांची आठवण करून देत आहेत.

कंगनाच्या वर्कफ्रंटविषयी बोलायचं झालं तर कंगनाचा 'धाकड' सिनेमा नुकताच भेटीस येऊन गेला. या सिनेमाच्या अपयशानं कंगनाला मोठा धक्का बसला. तिच्या आगामी प्रोजेक्टविषयी बोलायचं झालं तर कंगना 'तेजस','टीकू वेड्स शेरू', इमरजन्सी' आणि 'चंद्रमुखी २' सिनेमात दिसणार आहे.