Kangana Ranaut Birthday: कंगनाने मानले टीकाकारांचे आभार; म्हणाली, तुमच्यामुळेच मी... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangana ranaut, kangana ranaut news, kangana ranaut viral video

Kangana Ranaut Birthday: कंगनाने मानले टीकाकारांचे आभार; म्हणाली, तुमच्यामुळेच मी...

Kangana Ranaut Birthday: कंगना रनौत हे नाव उच्चारताच तिच्या सिनेमांआधी तिने निर्माण केलेले वाद समोर येतात. आज कंगनाचा वाढदिवस. कंगनाने आजवर तिच्या अभिनयामुळे सर्वांच्या मनामनात घर केलं.

आज कंगनाने तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्या फॅन्सचे खास अंदाजात आभार मानले आहेत. याशिवाय कंगनाने टीका करण्याऱ्यांचे गोड बोलून आभार मानले आहेत.

(Kangana Ranaut thanks critics on the occasion of her birthday)

कंगनाने या व्हिडिओत हिरव्या रंगाची साडी नेसली आहे. याशिवाय भरपूर दागिने घातले आहेत. कपाळावर भली मोठी टिकली लावलीय. अशा अंदाजात कंगना अतिशय सुंदर दिसतेय.

व्हिडिओत कंगना म्हणाली, “आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी माझे आई-वडील, माझी कुलदेवी आई अंबिका आणि माझे सर्व गुरु, माझे सर्व चाहते, हितचिंतक, माझे कुटुंब, मित्र यांचे आभार मानते.

मी माझ्या शत्रूंचेही आभार मानते, ज्यांनी आजपर्यंत मला कधीच आराम करू दिला नाही.

कंगना पुढे म्हणाली.. "मला यश मिळाले, पण तरीही माझ्या टीकाकारांनी मला यशाच्या मार्गावरून बाजूला जाऊ दिले नाही, मला लढायला आणि संघर्ष करायला शिकवलं.. मी नेहमीच त्यांचेही कृतज्ञ असेन."

कंगना शेवटी म्हणाली, "मित्रांनो, माझी विचारधारा अतिशय साधी आहे, माझे आचरण आणि विचारही अतिशय साधे आहेत. मला नेहमी सर्वांचे चांगले व्हावे असे वाटत असते. जर मी तुमचे मन दुखावले असेल तर त्याबद्दल मी माफी मागते.

श्री कृष्णाच्या कृपेने मला खूप काही मिळाले आहे. माझ्या मनात कोणासाठीही वाईट भावना नाही." अशी पोस्ट लिहून कंगनाने टिकाकारांवर स्तुतीसुमने उधळली आहेत.

कंगनाला कळत होतं कि अभिनेत्री होण्यासाठी कंगनाला घरातून तितका पाठिंबा नाही. तिचा निर्णय घरातले सदस्य मी मान्य करत नव्हते. त्यामुळे अभिनेत्री होण्यासाठी वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षी कंगनाने घर सोडले.

पुढे कंगना दिल्लीत आली आणि तिने मॉडेलिंगला सुरुवात केली. २००६ ला आलेल्या गँगस्टर सिनेमातून कंगनाने अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.

टॅग्स :kangana ranautBirthday