Kangana Ranautला बसला मोठा फटका! चित्रपटाच्या वितरकाने मागितले पैसे परत... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

kangna ranaut

Kangana Ranautला बसला मोठा फटका! चित्रपटाच्या वितरकाने मागितले पैसे परत

कंगना रणौत ही नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. ती बॉलिवुड कलाकारांवर टिका करण्याची एकही संधी सोडत नाही. तिचा 'थलायवी' हा चित्रपट रिलिज होण्यापुर्वी बरिच गाजला होती. कंगनानं या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये कसलीच कसर सोडली नाही.

मात्र प्रदर्शित झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलाच आपटला. ता त्याच चित्रपटाचे नुकसान भरून काढण्यासाठी निर्मात्यांकडून पैशांची मागणी करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या वितरकाने नुकसान भरपाईची मागणी केली आहे.

कंगना राणौतचा चित्रपट 'थलाइवी' सप्टेंबर 2021 मध्ये प्रदर्शित झाला. हा चित्रपट बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्री आणि तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जे. जयललिता यांच्यावर आधीरित होता. या चित्रपटात अभिनयासाठी कंगनाचे कौतुक झाले, पण कमाईचा विचार हा चित्रपट त्याचा खर्चही वसूल करु शकला नाही.

आता अशी चर्चा आहे की या चित्रपटाच्या जगतिक वितरक Zee ने चित्रपटाच्या निर्मात्यांकडून 6 कोटी रुपये परत करण्याची मागणी केली आहे.

वितरण कंपनीने या चित्रपटाच्या वितरण हक्कांसाठी 6 कोटी रुपये दिले होते, जे पैसे ते कमवू शकलेले नाहीत. आता Zeeने प्रॉडक्शन कंपनीला पत्र पाठवून ईमेलद्वारे पैसे देण्याची मागणी केली आहे. असं बोललं जात आहे. ज्याला त्यांनी अजून उत्तर दिलेले नाही.

तर दुसरीकडे चित्रपट प्रदर्शित होऊन दीड वर्षांहून अधिक काळ लोटला असल्याने कंपनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेऊ शकते, असे बोलले जात आहे.

या चित्रपटाची चर्चा तेव्हा जास्त झाली ज्यावेळी कंगनाने तिच्या चित्रपटाला दाद न देणाऱ्या बॉलीवूड स्टार्सवर तीव्र संताप व्यक्त केला होता.

कंगनाने या चित्रपटाला दाद न देणाऱ्या सेलिब्रिटींना बॉलीवूड माफिया म्हणत लिहिले होते की, 'मी बॉलीवूड माफियांची वाट पाहत आहे, ते आमचे राजकीय आणि वैचारिक मतभेद बाजूला ठेवतात, माझ्या चांगल्या कलेचे कौतुक करणे त्यांना कठीण वाटत नाही. कदाचित ते देखील त्यांच्या क्षुल्लक भावनांच्या वर उठतील आणि एखाद्या कलेचा जिंकू देतील थलाइवी