Kangana ranaut tweet against farmer strike in Delhi she trolled
Kangana ranaut tweet against farmer strike in Delhi she trolled

भारत बंद ला विरोध, 'रस्त्यावर या आणि सगळं एकदाचं संपून टाका'

मुंबई - दिल्लीत शेतक-यांच्या आंदोलनाची धग सा-या देशात पसरु लागली आहे. त्यांना राज्यातील अनेकांनी आपला पाठींबा दर्शवला आहे. गेल्या काही दिवसांपासून शेतकरी रस्त्यावर उतरुन सरकारच्या नव्या शेतीविषयक विधेयकाला विरोध करत आहे. यासगळ्यात अभिनेत्री कंगणानं त्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. त्यावरुन तिला ट्रोलही करण्यात आले आहे. मात्र शांत बसली तर ती कंगणा कसली, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

शेतक-यांच्या आंदोलनावर सडकून टीका करण्यात कंगणाचे नाव आघाडीवर आहे. अनेक राजकीय नेते, चित्रपट अभिनेते आणि दिग्दर्शक यांनी शेतकरी आंदोलनाला समर्थन दिले आहे.देशातील प्रमुख पक्षांनी त्याला पाठींबाही दिला आहे. अशात कंगणानं पुन्हा एकदा त्या आंदोलनावर टिप्पणी केली आहे. सोशल मीडियावर तिनं एका कवितेच्या माध्यमातून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. त्यात ती म्हणते, आता भारत बंद करण्याची वेळ झाली आहे. एका नावेला कुठल्याही प्रकारच्या तुफानाची काही गरज उरलेली नाही. पण असु द्या आपणच आपल्या पायावर एकदा कु-हाड मारुन घेऊया. जिथे रोजच्या जगण्यात आपण मरत चाललो आहोतच. देशभक्त असणा-यांनी आता त्यांच्यासाठी देशाचा एक तुकडा मागण्याची वेळ आली आहे.

सगळेच रस्त्यावर या आणि सगळं एकदाचं संपवून टाका. अशा उपरोधिक स्वरुपाची टीका केली आहे. यापूर्वीही तिनं या आंदोलनात सहभागी झालेल्या एका शेतकरी आजींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. 100 रुपयांमध्ये शेतकरी आजी त्या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. अशाप्रकारचं वक्तव्य कंगणानं केलं. त्यानंतर ती मोठ्या प्रमाणावर ट्रोल झाली. त्याप्रकारामुळे तिला कायदेशीर नोटीसही पाठविण्यात आली होती.

कंगणानं केलेल्या व्टिटमुळे शेतकरी हे देशाच्या विरोधात आहे अशाप्रकारचे चित्र निर्माण झाले आहे. त्यांच्या आंदोलनाला त्या नजरेतून पाहिले जात आहे. त्यामुळे तिनं विनाशर्त माफी मागावी अशी मागणी नोटीशीच्या माध्यमातून करण्यात आली.सीएएच्या विरोधात ज्या आजींनी आपली स्पष्ट भूमिका मांडली अशा बिल्कीस बानो यांच्यावर टीका करण्यास कंगणानं मागे पुढे पाहिले नाही.

बानो यांच्या शाहिनबाग येथील लढयाची देशपातळीवर दखल घेण्यात आली होती. शाहीनबागच्या आंदोलनात सहभागी झालेल्या आजी आता दिल्लीतही शेतक-यांच्या बाजूनं उभ्या राहिल्या. अस खोचक व्टिट तिनं केलं आहे. "same Dadi" who featured in Time Magazine was "available in 100 rupees". असंही ती म्हणाली होती. 
 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com