esakal | कपिल शर्माचं मुलगी अनायरासोबत पहिलं दिवाळी सेलिब्रेशन
sakal

बोलून बातमी शोधा

kapil

कपिलची मुलगी अनायराची ही पहिलीच दिवाळी होती. कपिलने दिवाळी सेलिब्रशनचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. 

कपिल शर्माचं मुलगी अनायरासोबत पहिलं दिवाळी सेलिब्रेशन

sakal_logo
By
दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- संपूर्ण देशाने यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे साधेपणाने दिवाळी साजरी केली. या दरम्यान सोशल मिडियावर बॉलीवूड पासून ते टीव्ही जगतातील सेलिब्रिटींनी दिवाळी सेलिब्रेशनचे फोटो शेअर केले आहेत. अनेक सेलिब्रिटींसोबतंच कॉमेडियन कपिल शर्माने देखील साधेपणाने दिवाळीचा हा सण साजरा केला. कपिलने आई, पत्नी गिन्नी आणि मुलगी अनायरासोबत दिवाळीचं सेलिब्रेशन केलं. कपिलची मुलगी अनायराची ही पहिलीच दिवाळी होती. कपिलने दिवाळी सेलिब्रशनचे काही फोटो सोशल मिडियावर पोस्ट केले आहेत. 

हे ही वाचा: छोट्याश्या इनायाने घरातंच काढली रांगोळी, सोहा अली खानने शेअर केले फोटो  

कपिल शर्माने शेअर केलेल्या फोटोमध्ये त्याच्यासोबत पत्नी गिन्नी , मुलगी अनायरा आणि त्याची आई दिसतेय. त्याने शेअर केलेले हे फोटो सोशल मिडियावर त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडत आहेत. कपिलच्या प्रसिद्धीमुळे चाहते त्याच्या मुलीलाही पसंत करतात. अनेकदा शोमध्ये तो अनायरासोबतचे किस्से शेअर करत असतो. या फोटोमध्ये कपिल, गिन्नी आणि अनायरला ब्लॅक आऊटफिटमध्ये सुंदर दिसत आहेत. तर कपिलच्या शोमध्ये अनेकदा हजेरी लावत असलेली त्याची आई निळ्या रंगाच्या सलवार कमीजमध्ये दिसतेय.

हा फोटो शेअर करत कपिलने कॅप्शनमध्ये लिहिलंय, ''माझ्या आणि माझ्या कुटुंबाकडून तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप शुभेच्छा.''कपिल शर्माच्या घरी डिसेंबर २०१९ मध्ये अनायराचा जन्म झाला होता. त्यामुळे तिची ही पहिलीच दिवाळी आहे. कपिल अनेकदा सणासुदीच्या दिवसातले त्याच्या मुलीचे फोटो सोशल मिडियावर शेअर करत असतो. मग दिवाळी असो, नवरात्र असो किंवा मग कोणती परंपरा. मुलगी अनायरासोबतचे कपिलचे फोटो चाहत्यांना प्रचंड आवडतात.   

kapil sharma celebrates diwali 2020 with wife ginni and daughter anayra shares photo with family