'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझर प्रदर्शित

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 ऑक्टोबर 2018

'खूब लडी मर्दानी थी वो झाँसी वाली रानी थी वो' 'हर हर महादेव' असे टीजरमधील डायलॉग अंगावर शहारे आणणारे आहेत. तसेच युध्द भूमी आणि मणिकर्णिकाने ब्रिटीशांविरोधात उभी केलेली फौज यांचा लढा दाखवला आहे.

मुंबई : बॉलिवूड क्वीन कंगना राणावत हिचा बहुचर्चित सिनेमा 'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझरचा नुकताच प्रदर्शित झाला आहे. प्रदर्शित झाल्याच्या तीन तासातच 2 लाखाच्यावर टीझरला व्ह्युज् मिळाले आहे. 'मणिकर्णिका' हा सिनेमा 19 व्या शतकातील झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या आयुष्यावर आधारित आहे. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात ब्रिटीश ईस्ट इंडीया कंपनीशी लढून आपल्या प्राणाची आहुती देणाऱ्या झाशीच्या राणीने इतिहास घडविला. 'मै मेरी झाँसी नही दूंगी' असे म्हणत त्या हिरकणाचा इतिहास आणि त्याग या सिनेमातून मांडला आहे. 

'खूब लडी मर्दानी थी वो झाँसी वाली रानी थी वो' 'हर हर महादेव' असे टीजरमधील डायलॉग अंगावर शहारे आणणारे आहेत. तसेच युध्द भूमी आणि मणिकर्णिकाने ब्रिटीशांविरोधात उभी केलेली फौज यांचा लढा दाखवला आहे. 'मणिकर्णिका'चे दिग्दर्शन क्रिश जगरलामुडी यांनी तर निर्मिती कमल जैन आणि झी स्टुडिओने केली आहे. सिनेमाची कथा के. व्ही. विजेंद्र प्रसाद यांनी लिहीली आहे. प्रसाद यांनीच 'बाहुबली'ची पटकथा लिहीली होती. कंगनासोबत सिनेमात निहार पांड्या, सोनू सूद, अंकिता लोखंडे, अतुल कुलकर्णी हे कलाकारही झळकणार आहे. निहार हा दुसऱ्या बाजीरावच्या भूमिकेत आहे. 

'मणिकर्णिका'तील कंगणाच्या वेशभूषेचीही खूप चर्चा आहे. सिनेमातील शूटींगवेळी तिचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. कंगणानेही 'मणिकर्णिका' च्या भूमिकेतील तिचे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. 
 

 

हा सिनेमा आधी 27 एप्रिल 2018 ला प्रदर्शित होणार होता. पण नंतर 3 ऑगस्ट 2018 ला प्रदर्शनाची तारीख ठरली. मात्र ही तारीखही रद्द झाली. आता सिनेमा 25 जानेवारी 2019 ला प्रदर्शित होणार असल्याचे बोलले जात आहे. 

कंगणाच्या डोक्याला 15 टाके ! 
'मणिकर्णिका'च्या शूटींग वेळी एका सिनमध्ये निहार आणि कंगना तलवारबाजी करत आहेत. ज्यात निहार तलवारीने कंगनावर वार करतो आणि कंगनाला डोकं खाली झुकवायचं असतं. पण हा सिन करण्यात दोघांचीही वेळ चूकली आणि तलवार कंगणाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये लागली. कंगणाला लगेच अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्या डोक्याला 15 टाके पडले होते. काही दिवस तिला रुग्णालातच राहावे लागले होते.   
 

'मणिकर्णिका: द क्वीन ऑफ झाशी'चा टीझर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kangana Ranauts Manikarnika Official Teaser Launched