Kangana Ranaut : 'ते खरे नवरा बायको नाहीतच'! कंगनाचा कुणावर निशाणा?

मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रेटींविषयी तिनं केलेली टिप्पणी गंभीर आहे. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.
Kangana Ranaut
Kangana Ranautesakal

Kangana Ranaut Take Indirectly Dig at Ranbir Kapoor Alia Bhatt : बॉलीवूडमध्ये तुम्ही कुणाच्याही बाबत काहीही बोलू शकता, त्याला अपवाद फक्त एका अभिनेत्रीचा. ती अभिनेत्री म्हणजे कंगना रनौत. या अभिनेत्रीनं गेल्या काही वर्षांपासून स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. देशातील वेगवेगळ्या मुद्दयांवर कंगना नेहमीच परखडपणे तिचं मत मांडत आली आहे.

आक्रमक, परखडपणे बोलून भल्याभल्यांना सणसणीत उत्तरं देणाऱ्या कंगनानं आता एका वेगळ्याच चर्चेला तोंड फोडले आहे. यावेळी तिनं बॉलीवूडमध्ये माफियाराज आणि त्याचा मानमानीपणा याकडे लक्ष वेधले आहे. याशिवाय मनोरंजन विश्वातील एका लोकप्रिय सेलिब्रेटींविषयी तिनं केलेली टिप्पणी गंभीर आहे. त्यामुळे कंगना पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात चर्चेत आली आहे.

Also Read - Adhik Shravan Maas : अधिक श्रावण मास चित्तशुद्धीचा पर्वकाळ

कंगनानं तिच्या इंस्टा स्टोरीवर जे लिहिलं आहे त्यामुळे ती वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं एका लोकप्रिय कपल्सविषयी लिहिताना त्यांनी केलेलं लग्न खोटं असल्याचे म्हटले आहे. ते जोडपं माझी भेट घेण्यासाठी अनेकांकडे गयावया करत होतं. अशा शब्दांत तिनं त्या सेलिब्रेटींवर निशाणा साधला आहे. कंगनानं ज्यांचे नाव घेतले आहे. ती जोडी सध्याच्या घडीला प्रचंड लोकप्रिय आहे.

Kangana Ranaut Take Indirectly Dig at Ranbir Kapoor Alia Bhatt
Kangana Ranaut Take Indirectly Dig at Ranbir Kapoor Alia Bhatt

सोशल मीडियावर ती पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. तिनं अप्रत्यक्षपणे रणबीर कपूर आणि आलिया भट्टवर निशाणा साधला आहे. असे नेटकऱ्यांनी म्हटले आहे. पण त्यांनी कंगनाचे काय वाईट केले आहे, असा प्रश्नही तिला नेटकऱ्यांनी विचारला आहे. त्यांनी केलेलं लग्न हे कसे खोटे होते हे सांगण्याचा प्रयत्न कंगनानं केला आहे. मात्र यासगळ्यात कंगनाच्या त्या पोस्टमध्ये रणबीर आणि आलियाचे नाव नाही. नेटकऱ्यांनी त्या नावाची चर्चा सुरु केली आहे.

माफिया गँग्सच्या नादी लागून केलं लग्न...

कंगनानं तिच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, त्या अभिनेत्यानं माफिया डॅडीच्या दबावाला बळी पडून ते लग्न केलं असं मला सांगायचं आहे. त्यानं सांगितलं होतं की, वडिलांच्या मनात असलेल्या मुलीसोबत लग्न केलं की त्याला ट्रायालॉजी रिटर्न चित्रपट मिळणार. मात्र ट्रायलॉजी बंद झाली आणि तो आता त्या फेक मॅरेजमधून बाहेर पडण्यासाठी धडपडत आहे. असा आरोप कंगनानं केला आहे.

Kangana Ranaut
Kajol Kiss: 29 वर्षांनंतर मोडला काजोलनं नो-किसिंग पॉलिसी रेकॉर्ड!

मात्र यासगळ्यात एक विशेष बाब म्हणजे, यासगळ्यातून त्या अभिनेत्याला बाहेर पडण्यासाठी कोणताही मार्ग उरलेला नाही. त्यानं आता त्याच्या संसारावर फोकस करण्यासाठी स्वताला वेळ द्यायला हवा. ते त्याच्यासाठी जास्त महत्वाचे आहे. हा भारत आहे. आणि आपल्या देशात एकदा का लग्न झाले की, मग काही खरं नाही. तेव्हा त्याच्याकडे आणखी सुधारण्यासाठी वेळ आहे. अशा शब्दांत कंगनानं तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Kangana Ranaut
Akshay Kumar : अक्षय धुतल्या तांदळाचा नाही, बॉलीवूडमधील एका अभिनेत्रीला त्यानं...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com