Kangana Ranaut: बायडेन आणि दलाई लामा यांच्यावर पोस्ट करुन कंगना पस्तावली! बौद्ध लोकांनी केलं घराबाहेर निदर्शनं..

Kangana Ranaut
Kangana Ranaut Esakal

अभिनेत्री कंगना राणौत हे मनोरंजन विश्वातलं असं नाव आहे जे तिच्या चित्रपटांमुळे कमी आणि तिच्या वक्यव्यामुळे जास्त चर्चेत असतं. तिच्या बोल्ड वक्तव्यांमुळे आणि पोस्टमुळे ती नेहमीच चर्चेत असते . ती जवळपास सर्वच प्रश्नावर तिचं मतं माडंत असते.

मग ते राजकिय असो किंवा मनोरंजन विश्वाशी निगडीत. इतकच नाही तर ती जागतिक स्तरावरील मुद्यावर देखील भाष्य करत असते. असचं काहीसं तिनं यावेळीही केलं मात्र ते तिच्या अंगलट आलेलं दिसत आहे.

Kangana Ranaut
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: 'किसी का भाई किसी की जान'नं दिला प्रेक्षकांच्या डोक्याला ताप...भन्नाट मीम्स व्हायरल

वास्तविक काही काळापूर्वी तिबेटचे धार्मिक नेते दलाई लामा यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता ज्यामध्ये ते एका मुलाला स्वतःचे चुंबन घेण्यास सांगत आहेत. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर बराच वाद झाला होता. याबाबत दलाई लामा यांनी माफीही मागितली होती.

या व्हिडिओवर अनेक मीम्सही बनवण्यात आले होते. त्यातच एका मीम्समध्ये अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचा चेहरा दलाई लामा यांच्याऐवजी बदलण्यात आला होता. असे ट्विटही कंगनाने केले आहे.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

हा व्हिडिओ शेअर करताना कंगनाने लिहिले- 'हम्म, दोघांनाही एकच आजार आहे. नक्कीच दोघेही मित्र असू शकतात. कंगनाची ही गोष्ट काही लोकांना आवडली नाही. त्यानंतर आता कंगनाला विरोध होत आहे. कंगनाच्या पाली हिल कार्यालयाबाहेर काही लोकांनी निदर्शने केली. कंगनाने याबाबत खुलासाही केला आहे.

Kangana Ranaut
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan Movie Review : डोक्याची मंडई अन्‌ जीवघेणा ‘भाईजान’!

तिच्या मते, त्यांनी धार्मिक नेते दलाई लामा आणि अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांच्याबद्दल पोस्ट केल्यानंतर हे घडलं. निषेधाचा एक फोटो शेअर करून, अभिनेत्रीने तिचे हेतू स्पष्ट केले आणि तिच्या या पोस्टला 'निरुपद्रवी विनोद' म्हटले.

Kangana Ranaut
Kangana Ranaut

कंगना रणौतने लिहिले, "बौद्ध लोकांचा एक गट पाली हिल येथील माझ्या कार्यालयाबाहेर निदर्शने करत आहे, मला कोणाला दुखावण्याचा हेतू नव्हता, जो बिडेन दलाई लामा यांच्याशी मैत्री करत असल्याबद्दल हा केवळ एक विनोद होता. '

'हा एक विनोद होता… . कृपया माझ्या हेतूबद्दल गैरसमज करून घेऊ नका. ती म्हणाली, "माझा बुद्धांच्या शिकवणीवर विश्वास आहे आणि परमपूज्य 14 व्या दलाई लांबा यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य सार्वजनिक सेवेत व्यतीत केले आहे... माझे कोणाच्याही विरोधात नव्हते... तुम्ही लोकांनी इतक्या उन्हात उभे राहू नका, घरी जाऊन आराम करा.'

Kangana Ranaut
Amitabh Bachchan Tweet: शहंशाह खुश हुआ..! ‘तू चीज़ बड़ी है musk’,ट्विटरवर ब्लु टिक मिळताच अमिताभ इलॉनवर खुश

कंगनानेही आपले शब्द अशा प्रकारे पोस्ट करत माफीही मागितली. तसे, कंगनाला लोकांच्या विरोधाला सामोरे जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. कंगना अनेकदा चर्चेत असते. 

चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेत्री लवकरच तिच्या आगामी 'इमर्जन्सी' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात कंगना माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट मणिकर्णिका फिल्म्सच्या बॅनरखाली बनत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com