मीना बिंदणी "नवी भाबो'... 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

मीना बिंदणी आठवतेय ना... अहो तीच "स्टार प्लस' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका "दिया और बाती हम'मधली. ही मालिका बंद झाली तेव्हा प्रेक्षक खूपच भावूक झाले होते.

मीना बिंदणी आठवतेय ना... अहो तीच "स्टार प्लस' वाहिनीवरील लोकप्रिय मालिका "दिया और बाती हम'मधली. ही मालिका बंद झाली तेव्हा प्रेक्षक खूपच भावूक झाले होते.

मात्र आता या मालिकेचा "तू सूरज मैं सांझ पियाजी' हा सिक्वेल आल्यामुळे रसिक खूप खूश झालेत. त्यात म्हणे मीना बिंदणी "नवीन भाबो' आहे. मीना बिंदणीचा रोल साकारणारी अभिनेत्री कनिका महेश्‍वरी सांगते की, "या सिक्वेलमध्ये मीना ही नवीन भाबो आहे, असं मला भूमिका देतेवेळी सांगितले. प्रेक्षकांना मीना बिंदणीमध्ये फार मोठा बदल पाहायला मिळेल. वय, स्वभाव, राहणीमान, पोशाख, वागणं-बोलणं यात नक्कीच फरक पाहायला मिळणार आहे. आता पहिल्यासारखे लटकेझटके नाहीत. 

"दिया और बाती हम'चा सिक्वेल प्रेक्षकांना आवडेल का, याबाबत कनिकाने सांगितले की, "एक तर छोट्या पडद्यावर दीर्घ काळ चाललेल्या व प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या फार कमी मालिका आहेत. ही घराघरात लोकप्रिय झालेली मालिका आहे. छोट्या पडद्यावर कुठे जास्त सिक्वेल आलेले आहेत. उलट हे आव्हान मी स्वीकारले असून त्यापेक्षा हा सिक्वेल यशस्वी करण्याचे संपूर्ण टीमने ठरलंय. 

Web Title: Kanika Maheshwari

टॅग्स