अभिनेता संचारी विजयचं निधन; अवयवदानाचा कुटुंबीयांचा निर्णय

शनिवारी झालेल्या भीषण अपघातानंतर विजय कोमात होता.
Sanchari Vijay
Sanchari Vijay twitter

राष्ट्रीय पुरस्कार विजेता कन्नड अभिनेता संचारी विजयचं Sanchari Vijay मंगळवारी (१५ जून) पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास निधन झालं. तो ३८ वर्षांचा होता बेंगळुरूमध्ये शनिवारी रात्री त्याचा अपघात झाला होता. बाईक अपघातात विजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि तो कोमात होता. मेंदूवर आपत्कालीन शस्त्रक्रिया करूनही त्याचे प्राण वाचू शकले नाही. विजयच्या निधनानंतर त्याचे अवयव दान करण्याचा निर्णय त्याच्या कुटुंबीयांनी घेतला. विजय ब्रेन डेड असल्याचं सोमवारी डॉक्टरांनी सांगितलं. त्यानंतर मंगळवारी पहाटे विजयने अखेरचा श्वास घेतला. बेंगळुरूमधील अपोलो रुग्णालयाने याबद्दलची माहिती दिली. (Kannada actor Sanchari Vijay dies family to donate his organs)

"तुम्हा सर्वांना हे माहितच आहे की विजयने नेहमीच समाजासाठी काम केलं. कोरोना महामारी आणि लॉकडाउनमध्येही त्याने समाजकार्य अविरतपणे चालू ठेवलं. त्याच्या निधनानंतर आम्ही विजयचे अवयवदान करण्यात निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विजयच्या आत्म्याला शांती मिळेल, असा आमचा विश्वास आहे. मृत्यूनंतरही त्याने समाजासाठी काम केलं", अशा शब्दांत विजयचा भाऊ सिद्धेश कुमार यांनी भावना व्यक्त केल्या.

कसा झाला अपघात?

बेंगळुरूतील जे.पी. नगर इथं बाईकवरून जात असताना विजयचा अपघात झाला. यावेळी बाईकवर विजयचा मित्र नविन मागे बसला होता. रस्त्यावरील एका इलेक्ट्रिक पोलला त्यांची बाईक जोरात आदळली आणि हा अपघात झाला. या अपघातात विजयचा ४२ वर्षीय मित्र नविनसुद्धा जखमी झाला आहे. शनिवारी रात्री ११.४५ च्या सुमारास नविन आणि विजय हे औषधं खरेदीसाठी घरातून निघाले होते. नविनच्या घरी रात्री जेवल्यानंतर हे दोघं बाहेर पडले आणि त्याच्या घराजवळच काही अंतरावर हा अपघात जाला. पावसामुळे बाईकचा तोल ढासळला आणि हा अपघात झाल्याचं नविनने पोलिसांना सांगितलं.

"लॉकडाउनमध्ये गरजू आणि गरीब मुलांना अन्नधान्य पुरवण्याचं काम विजय आमच्यासोबत मिळून करत होता. त्याचप्रमाणे औषधांची व्यवस्थाही तो करत होता", असं कन्नड अभिनेते नीनासम सतीश म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com