ठोको ताली: 'नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा, मी झाले ट्रोल'

पंजाबमधील राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
ठोको ताली: 'नवज्योत सिंग सिद्धूंचा राजीनामा, मी झाले ट्रोल'

पंजाबमधील राजकारणानं वेगळं वळण घेतलं आहे. कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धूंनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्याच दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (captain amrinder singh) हे भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतल्याचे दिसून आले. यासगळ्याचे पडसाद सोशल मीडियावरही उमटण्यास सुरुवात झाली. विशेषत नवज्योत सिंग सिद्धू (navjyoy singh siddhu) यांना त्यात टार्गेट करण्यात आले होते. त्यांच्यासोबत अभिनेत्री आणि द कपिल शर्मा शो च्या जज अर्चना पुरन सिंग यांचाही समावेश होता. आता यासगळ्यात अर्चना पुरन सिंग (Archana Puran Singh) यांनी स्वता:वर एक मीम्स तयार करुन ते व्हायरल केले आहे. त्याला प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली आहे.

अर्चना पुरन सिंग यांनी आपल्यावरील ते वेगवेगळे मीम्स सोशल मीडियावरुन शेयर केले आहेत. मनोरंजन विश्वानं देखील त्याची दखल घेतली आहे. विशेषत कपिल शर्मा मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या सिद्धूंनी जेव्हा राजीनामा दिला. त्यानंतर तासाभरातच ते सोशल मीडियावर टेड्रींगचा विषय होते. यासगळ्या प्रकरणात अर्चना पुरन सिंग यांनाही ट्रोल करण्यात आले आहे. द कपिल शर्मा कॉमेडी शो (kapil sharma show) मध्ये परिक्षकाच्या भूमिकेत असणाऱ्या अर्चना पुरन सिंग (Archana Puran Singh) सध्या ट्रोल होताना दिसत आहे. त्यांना नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्या शो मध्ये सिद्धू त्यांचे सहकारी होते.

सिद्धू यांनी कॉग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर त्या शो ची धूरा अर्चना यांनी आपल्याकडे घेतली होती. आता सिद्धू यांनी राजीनामा दिला आहे. त्यावरुन त्यांना ट्रोल केले जात आहे. यापूर्वी अर्चना यांनी सिद्धू यांच्या निवडीवर त्यांचे अभिनंदन करताना, तुम्ही प्रदेशाध्यक्ष झालात पण मोठ्या प्रमाणावर बूके मला मिळाले आहेत. असं सिद्धू यांना सांगितलं होतं. त्यावर सिद्धू यांनी देखील त्यांचे अभिनंदन केले होते. आता नेटकऱ्यांनी सिद्धूंनी राजीनामा दिल्यानंतर सगळ्यात जास्त आनंद झाला असेल, तर तो अर्चना सिंग यांना असं म्हटलं आहे. याशिवाय वेगवेगळ्या प्रकारचे मीम्सही व्हायरल झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com