Kapil Sharma : कपिलला पराठा खाऊ घालणाऱ्यावर गुन्हा दाखल, नेमकं प्रकरण होतं तरी काय?

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे.
Fir Against Heart Attack Parantha Owner
Fir Against Heart Attack Parantha OwnerSakal

Fir Against Heart Attack Parantha Owner : प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहणारा सेलिब्रेटी आहे. गेल्या काही वर्षात तो देशातील सर्वाधिक प्रभावी सेलिब्रेटींपैकी एक झाला आहे. टीव्ही मनोरंजन विश्वात कपिलनं त्याच्या नावाचा मोठा फॅनबेस तयार केला आहे.

आता कपिल शर्माच्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे त्याला पराठा खाऊ घालणाऱ्या एका पराठा हॉटेल चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचं झालं असं की, पंजाबमधल्या जालंधर येथे मॉडेल टाऊनमध्ये हार्ट अॅटॅक नावाचा पराठा बनविणारे दविंदर सिंह आहेत.त्यांचे हॉटेल प्रसिद्ध आहे. स्थानिकांची तिथे नेहमीच गर्दी होत असते. त्यांनी कपिललाही नेहमी प्रमाणे पराठा दिला मात्र त्यामुळे वेगळाच प्रकार समोर आला आहे.

दविंदर सिंह यांच्याविरोधात आता पोलिसांनी तक्रार दाखल केली आहे. कपिल शर्मा हे दविंदर सिंह यांचा तो व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिल्यानंतर कपिल तो पराठा खाण्यासाठी गेला होता. पराठा खाल्ल्यानंतर कपिलनं त्यांची खूप प्रशंसाही केली होती. या सगळ्यात जालंधर पोलिसांनी दविंदर सिंह यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दविंदर यांनी डेप्युटी कमिशनर यांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.आता त्यांची जामिनावर सुटकाही करण्यात आली आहे. दुसरं एक कारण म्हणजे, कपिल शर्मा आणि त्याची पत्नी जेव्हा दविंदर सिंह यांच्या हॉटेलवर पराठा खाण्यासाठी गेले तेव्हा ते बंद झाले होते.

दविंदर यांनी रात्री उशिरा हॉटेल सुरु करुन कपिलला तो पराठा खाऊ घातला. अशाप्रकारे त्यानं नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यत दुकान सुरु ठेवल्यानंतर कलम १८८ अंतर्गत दविंदर सिंह यांच्यावर कारवाई करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com