'इन्स्टा' सोबतच सिनेसृष्टीतही कपिल शर्माचे पुनरागमन !

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 ऑक्टोबर 2018

'सन ऑफ मनजित सिंग' हा पंजाबी सिनेमा आहे. सिनेमात पंजाबी स्टार गुरप्रीत घुग्गी प्रमुख भूमिकेत आहे. सुमीत सिंह यांच्यासह मिळून कपिलने सिनेमाची निर्मिती केली आहे.

मुंबई : कॉमेडी किंग कपिल शर्मा याने बॉलिवूडमध्ये अभिनयात आपले लक आजमावले. ते तितकेसे यशस्वी ठरले नाही. आता कपिलने आणखी एक प्रयोग केला आहे. 'सन ऑफ मनजित सिंग' हा सिनेमा घेऊन कपिल सिनेसृष्टीत पुनरागमन करणार आहे. कपिलने सिनेमाची निर्मिती केली आहे. या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन कपिलने हा ट्रेलर शेअर केला आहे. 

'सन ऑफ मनजित सिंग' हा पंजाबी सिनेमा आहे. सिनेमात पंजाबी स्टार गुरप्रीत घुग्गी प्रमुख भूमिकेत आहे. सुमीत सिंह यांच्यासह मिळून कपिलने सिनेमाची निर्मिती केली आहे. विक्रम ग्रोवर यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या हा सिनेमा 12 ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये दाखविल्याप्रमाणे, 'वडील, मुलगा आणि मुलगी असे मध्यमवर्गीय कुटुंब दाखवले आहे. मुलाचे शिक्षणात जास्त स्वारस्य नसतं, खेळात त्याची आवड असते, खेळात त्याची कामगिरीही चांगली असते. पण वडील त्याला परीक्षेत चांगले गुण आणण्यासाठी दटावत असतात. त्याच्या खेळाला विरोध करत असतात.' या सिनेमा ट्रेलर बघून 'शिक्षणाच्या आईचा घो' या मराठी सिनेमाची आठवण होते.

'सन ऑफ मनजित सिंग'​चा ट्रेलर :

 

'कॉमेडी नाईट विथ कपिल शर्मा' या कॉमेडी शोने विशेष लक्ष वेधणारा कपिल गेल्या काही महिन्यांपासून सोशल मिडीयापासून लांब होता. आता सिनेसृष्टीसोबतच त्याने इन्टाग्राम अकाउंटवरही पुनरागमन केले आहे. त्याने सात महिन्यानंतर नुकताच त्याचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. फोटोच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहील्याप्रमाणे तो सध्या पंजाबमध्ये आहे आणि त्याने पाच किलो वजन वाढविले आहे.  
 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

#punjab #amritsar #jalandhar #kulche #mathicholle #Lassi = 5 kg weight gain

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Kapil Sharmas return on social media and movie industry