Salman Khan: 25 वर्षांनंतर करण जोहर-सलमान पुन्हा एकत्र... 'टायगर 3' नंतर करणार धमाका

सलमान खानने 1998 मध्ये करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है' मध्ये छोटी भूमिका केली होती.
Karan Johar and Salman
Karan Johar and SalmanSakal

सलमान खानने 1998 मध्ये करण जोहरच्या 'कुछ कुछ होता है'मध्ये छोटी भूमिका केली होती. तेव्हापासून जवळपास 25 वर्षे उलटून गेली आहेत आणि तेव्हापासून दोघांनी एकही चित्रपट एकत्र केलेला नाही. बऱ्याच दिवसांपासून ही जोडी पुन्हा एकदा हातमिळवणी करणार असल्याच्या बातम्या येत आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, करण जोहरने एका चित्रपटासाठी सलमान खानशी चर्चा केली आहे. त्याने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सलमान खानशी संपर्क साधला होता. हा चित्रपट वडील आणि मुलीच्या नात्यावर आधारित असल्याचे बोलले जात आहे.

यासाठी सलमान आणि करण जोहर यांच्यात दोन मिटिंग झाल्या आहेत. सलमान खान त्यावेळी ह्यूमन ड्रामा फिल्म करण्यास उत्सुक नसल्यामुळे ही चर्चा पूर्ण होऊ शकली नाही. त्याने करण जोहरला आणखी काही चांगल्या प्रोजेक्टसाठी विनंती केली.

Karan Johar and Salman
Ajit Pawar on TDM: हे दुर्दैव, सिनेमाला लवकरात लवकर.. TDM साठी अजित पवारांनी दिला आदेश

रिपोर्ट्सनुसार, या वर्षी जानेवारीमध्ये करण जोहरने 'शेरशाह' चित्रपटाचे दिग्दर्शक विष्णुवर्धनसोबत आणखी एका चित्रपटासाठी सलमान खानशी संपर्क साधला होता. या संदर्भात त्यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या आणि तिघांनीही चित्रपटाच्या विविध पैलूंवर चर्चा केली. तिघेही एकत्र काम करण्याचा विचार करत असल्याचे बोलले जात आहे.

काही दिवसांपूर्वी असाही दावा करण्यात आला होता की हा चित्रपट 2024 मध्ये ईदला प्रदर्शित होणार आहे, मात्र आता तो ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. सलमानने चित्रपटासाठी संमती दिल्यास त्याचे प्री-प्रॉडक्शन आणि कास्टिंगचे काम दोन-तीन महिन्यांत पूर्ण होईल. यानंतर या वर्षी नोव्हेंबरपर्यंत त्याचे शूटिंग सुरू होईल. या चित्रपटावर काम मोठ्या प्रमाणावर होणार आहे.

Karan Johar and Salman
Met Gala 2023Vral Video: झुरळ म्हणतयं मला रॅम्प वॉक करायचा...

सलमान खान सध्या त्याचा आगामी चित्रपट 'टायगर 3' मध्ये व्यस्त आहे. प्रेक्षक या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात सलमानसोबत कतरिना कैफ आणि इमरान हाश्मी देखील दिसणार आहेत. या चित्रपटाची खास गोष्ट म्हणजे यात शाहरुख खान पठाणच्या भूमिकेत आहे. या महिन्याच्या अखेरीस 'टायगर 3'चे काम पूर्ण केल्यानंतरच सलमान करण जोहरच्या चित्रपटाचा विचार करेल, असे म्हटले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com