Karan Johar: बॉलीवूड संपले? प्रश्नावर करण जोहरचं सणसणीत उत्तर, 'लोकांना...'

बॉलीवूडसाठी सध्या कठीण काळ सुरु आहे. गेल्यावर्षीपासून टॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. पुष्पापासून या चित्रपटांना तुफान लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली होती.
 karan johar news
karan johar news sakal

Karan Johar News: बॉलीवूडसाठी सध्या कठीण काळ सुरु आहे. गेल्यावर्षीपासून टॉलीवूडच्या चित्रपटांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. पुष्पापासून या चित्रपटांना तुफान लोकप्रियता मिळण्यास सुरुवात झाली होती. ती अद्याप कायम आहे. त्या तुलनेत बॉलीवूडपटांना मिळणारी लोकप्रियता दिवसेंदिवस घटत चालल्याचे दिसते. (Bollywood News) यावर बॉलीवूडमधील रथी महारथींनी काळजी व्यक्त केली आहे. आता प्रसिद्ध निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहरनं मोठं वक्तव्य केलं आहे. त्यानं केलेलं वक्तव्य आपण जाणून घेणार आहोत.

यावर्षी बॉलीवूडचे चित्रपट फारशी चमक दाखवू शकलेले नाहीत. त्यात करण (Entertainment News) जोहरच्या धर्मा प्रॉडक्शननं तयार केलेले पाच चित्रपट फ्लॉप झाले आहेत. त्यात बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार, रणवीर सिंग यांच्या चित्रपटांचा समावेश आहे. अनेकांनी आता बॉलीवूडचे दिवस भरले आहेत अशा प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. बॉलीवूड खान मंडळींनी देखील काळजी व्यक्त केली होती. त्यामुळेच की काय त्यांनी यापुढील काळात साऊथमधील कलाकारांना सोबत घेऊन काम करण्यास सुरुवात केली आहे. त्यांच्या चित्रपटांचे प्रमोशनही केले होते.

करण जोहर यासगळ्या परिस्थितीवर म्हणतो, काळ, वेळ सगळं काही वेगानं बदलते आहे. आपण त्याचा विचार केला पाहिजे. लोकांना खूप काही ऑप्शन उपलब्ध झाले आहे. दोन वर्षांपासून मनोरंजन क्षेत्रात झालेले बदल चक्रावून टाकणारे आहे. त्यामुळे लोकांना काही करुन थिएटरपर्यत आणणे हेच मोठं आव्हान होऊन बसलं आहे. त्यांना हवे तसे कथानक, हिरो, संवाद, छायाचित्रण या गोष्टी असल्यास त्यांची पसंती हमखास मिळते. अन्यथा त्यांना या गोष्टी दुसऱ्या चित्रपटात मिळाल्या की तो चित्रपट पाहण्यास पसंती देतात.

 karan johar news
Tollywood Vs Bollywood: 'भाषेचं काय घेऊन बसता, सगळचं...' आलिया बिनधास्त बोलली

करण जोहरच्या चित्रपटांनी कायमच प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवले आहे. तो म्हणतो लोकं म्हणतात बॉलीवूड संपले पण असं म्हणणं मुर्खपणा आहे. गंगुबाई काठियावाडी, भुलभुलैय्या सारख्या चित्रपटांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. मला वाटतं चित्रपट तयार झाल्यावर त्याचा प्रचार, प्रसार करणे हेच मोठे आव्हान आहे. आता प्रत्येकांपर्यत तुमचा चित्रपट जाणे हेच महत्वाचे आहे. असं करणचं म्हणणं आहे.

 karan johar news
Koffee With karan 7 शो ची कार्तिकने उडवली खिल्ली, म्हणाला, 'मला अभिमान....'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com