Love Storiyaan Trailer Out: "जेव्हा प्रेम असते तेव्हा इतर काहीही महत्त्वाचे नसते! "; 'लव्ह स्टोरीयां' चा ट्रेलर रिलीज

Love Storiyaan Trailer Out: 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.
Love Storiyaan Trailer Out
Love Storiyaan Trailer Out

Karan Johar: दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) हा व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेक्षकांना एक खास गिफ्ट देणार आहे. करणच्या धर्मिक प्रॉडक्शनचा 'लव्ह स्टोरीयां' (Love Storiyaa) हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटामध्ये सहा प्रेमकथा दाखवण्यात येणार आहेत. 'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच करणनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

करणनं शेअर केला ट्रेलर

करणनं लव्ह स्टोरीयां या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये विविध प्रेमकथांची झलक बघायला मिळते. या ट्रेलरला करणनं कॅप्शन दिलं, "जेव्हा प्रेम असते तेव्हा इतर काहीही महत्त्वाचे नसते! त्याचसाठी रिमाइंडर म्हणून वास्तविक जीवनातील प्रेमकथा आम्ही दाखवणार आहेत. सहा वास्तविक जीवनातील प्रेमकथा ज्या तुम्हाला प्रेमाच्या जादूची आणि शक्ती दाखवतील!"

'लव्ह स्टोरीयां' या चित्रपटांमध्ये श्रीमंती-गरिबी, सीमा, जेंडर या सर्व गोष्टी जुगारुन प्रेम करणाऱ्यांच्या कथा दाखवण्यात येणार आहेत.

पाहा व्हिडीओ:

कधी रिलीज होणार 'लव्ह स्टोरीयां'?

करण जोहरची आगामी 'लव्ह स्टोरीयां' हा चित्रपट 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन-डेला Amazon Prime या ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटातील सहा कथा सहा दिग्दर्शकांनी दिग्दर्शित केल्या आहेत. अक्षय इंदिकर, अर्चना, कॉलिन डिकुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी यांनी या कथा दिग्दर्शित केल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com