
karan Johar Breakup: कॉफी विथ करण मध्ये सेलिब्रिटींच्या वैयक्तिक आयुष्याविषयी खुलासे झालेले नेहमीच आपण पाहतो. पण कधी करण जोहरच्या मनात काय दडलंय हे मात्र अद्याप समोर आलं नव्हतं. नुकत्याच स्ट्रीम झालेल्या एका एपिसोडमध्ये करण जोहरने आपल्या मनातलं ते सत्य सांगत सर्वांसमोर मोठा खुलासा केला आहे.(Karan Johar reveals had breakup was in a relationship varun dhawan supported in tough phase.)
करण जोहरने पहिल्यांदा आपलं रिलेशनशीप स्टेटस सर्वांसमोर शेअर केलं आहे. त्यानं चॅट शो दरम्यान वरुण धवन आणि अनिल कपूर सोबत बोलताना सांगितलं की सध्या तो सिंगल आहे,त्याचं ब्रेकअप झालं आहे. करण जोहरने या दरम्यान वरुण धवनची खूपच प्रशंसा केली. करण म्हणाला की,''मी ब्रेकअपमुळे मनातून पूर्णतः तुटलो होतो, त्यावेळी वरुण धवनने मला खूप समजावलं,मला धीर दिला''. खरंतर,'कॉफी विथ करण 7' मध्ये करणला ब्रेकअप विषयी सांगण्यास वरुण धवननेच त्याच्याकडे हट्ट धरला होता.
करणच्या चॅट शो मध्ये 'प्रेमात मिळालेला धोका' यावर चर्चा सुरु झाली तेव्हा वरुणनं करणला प्रश्न केला की,''तो या विषयावर जास्त का बोलतो, एवढा हा विषय त्याला महत्त्वाचा का वाटतो?'' याचं उत्तर देताना करण जोहर म्हणाला,''त्याला यातून लोकांचे स्वभाव कळतात, जे जाणून घेण्यास त्याला आवडतं''. तेव्हा वरुण लगेच करण जोहरला म्हणाला,''त्याला नात्यात कोणी धोका दिला आहे का? त्यानं कोणाला फसवलं आहे का?'' करण यावर उत्तर देत म्हणाला,''मी कोणाला नात्यात कधीच दगा दिला नाही''. करणच्या याच गोष्टीला मुद्दा बनवत वरुण पटकन म्हणाला,''याचा अर्थ तू नॅशनल टेलीव्हिजनवर बोलत आहेस की तू रिलेशनशीपमध्ये आहेस''.
यावर खुलासा करताना करण जोहर म्हणाला,''तुला माहीत आहे की मी आता रिलेशनशीपमध्ये नाही. तुला माहितीय माझं ब्रेकअप झालं आहे''. करणचं हे उत्तर ऐकून वरुण हसायला लागला आणि म्हणाला,''मला वाटत होतं करणने ही गोष्ट कबूल करावी''. करण जोहर पुढे म्हणाला,''तुला माहितीय माझ्या ब्रेकअपविषयी. माझ्या त्या रिलेशनशीप दरम्यान तू मला खूप सहकार्य केलंस. त्याबद्दल आभारी आहे,पण मी ब्रेकअप केलं आहे''. आता ही गोष्ट तर पक्की झाली की करण जोहर सध्या कोणत्या नात्यात नाही. पण करणनं कोणासोबत आपलं नातं होतं यावर मात्र बोलणं टाळलं.
करण जोहरच्या लेटेस्ट एपिसोडविषयी बोलायचं झालं तर, या चॅट शो मध्ये अनिल कपूर आणि वरुण धवनमुळे हा एपिसोड खूप रंगला. प्रत्येक ५ मिनिटानं हास्याचे कारंजे उडत होते. दोघांनी धमाल डान्स करत,एकमेकांची खिल्ली उडवतानाही मागेपुढे पाहिलं नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.