'खूप लोकांना माहीत नाही की...',पंकज त्रिपाठीचा सिद्धार्थ शुक्लाविषयी मोठा खुलासा

सहज अभिनय,भाषेवरचं प्रभुत्व आणि संवाद साधणारी बॉडी लॅंग्वेज हे ज्यांचे युएसपी आहेत असे पंकज त्रिपाठी वेब सीरिज क्रिमिनल जस्टिसमुळे सध्या चर्चेत आहेत.
Pankaj Tripathi talk about Sidharth Shukla.
Pankaj Tripathi talk about Sidharth Shukla.Google
Updated on

Pankaj Tripathi on Sidharth Shukla:पंकज त्रिपाठी सध्या वेब सीरिज 'क्रिमिनल जस्टिस'मुळे चर्चेत आहे. अर्थात पंकज त्रिपाठींचा सहज अभिनय,भाषेवरचं प्रभुत्व आणि संवाद साधणारी बॉडी लॅंग्वेज हे युएसपी यासाठी सर्वाधिक महत्त्वाचं काम करुन गेले आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थ शुक्लाविषयी वक्तव्य केलं आहे. त्यांनी सिद्धार्थविषयी अशा काही गोष्टी त्या मुलाखतीत सांगितल्या ज्या आधी त्यांनी कोणालाच सांगितल्या नव्हत्या. ४० वर्षीय सिद्धार्थ शुक्ला याचं गेल्याच वर्षी हार्टअटॅकने निधन झाले होते.(Pankaj Tripathi talk about Sidharth Shukla)

Pankaj Tripathi talk about Sidharth Shukla.
नवरात्रीला गरबा क्वीन फाल्गुनीचं सरप्राइज...

पंकज त्रिपाठी यांना नेटफ्लिक्सवर रिलीज झालेल्या 'शेरदील: द पीलीभीती सागा' या सिनेमात पाहिलं गेलं होतं, जो सिनेमा जून महिन्यात रिलीज झाला होता. आता ते 'ओ माई' मध्ये सयानी गुप्ता आणि नीरज काबी सोबत दिसणार आहे. त्यांनी काही दिवसांपूर्वी 'क्रिमिनल जस्टिस' वेब सीरिजमध्ये वकील माधव मिश्राची व्यक्तिरेखा साकारलीय. यामध्ये श्वेता प्रसाद बसु,स्वस्तिका मुखर्जी,पूरब कोहली,आदित्य गुप्ता,देश्ना दुगाड आणि गौरव गेरे देखील आहेत.

पंकज त्रिपाठी यांनी एका रेडिओ स्टेशनला दिलेल्या मुलाखतीच्या दरम्यान जेव्हा त्यांना सांगितलं गेलं की, शहनाज गिलनं एका टॉक शो मध्ये त्यांची प्रशंसा केली होती,तेव्हा मिर्झापूर अभिनेता म्हणाला,''हो,एक अभिनेता म्हणून मी तिचा फेव्हरेट आहे. आणि तिनं हे सर्वांसमोर सांगितलं याबद्दल मी तिचा आभारी आहे''. पुढे पंकज म्हणाले,''आता तुम्ही शहनाझचं नाव घेतलंत तर मला सिद्धार्थ आठवला. खूप लोकांना माहित नाही आणि मी देखील कधी सांगितलं नाही,पण सिद्धार्थ माझा खूप आदर करायचा. आमचे एकमेकांशी खूप जवळचे संबंध होते, आम्ही खूप कनेक्टेड होतो''.

शहनाझ गिलला रिअॅलिटी शो 'बिग बॉस १३' मुळे प्रसिद्धी मिळाली. शो दरम्यान शहनाझ आणि सिद्धार्थ यांची खूप घट्ट मैत्री झालेली आपण सगळ्यांनीच पाहिली असेल. या जोडीला चाहतेही Sidnaaz म्हणून बोलवायला लागले, पण त्यांच्या नशीबात एकत्र राहणं लिहिलं नव्हतं. २ सप्टेंबर,२०२१ रोजी सिद्धार्थचं हार्टअटॅकने निधन झालं. चाहते आजही त्याच्या आठवणीनं भावूक होताना दिसतात. आणि हेच कारण आहे की ट्वीटरवर अनेकदा #Sidharthshukla ट्रेन्ड होताना दिसतं.

Pankaj Tripathi talk about Sidharth Shukla.
प्रियंकाचे शॉकिंग खुलासे...

शहनाझ गिल विषयी बोलायचं झालं तर ती लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सध्या ती सलमान खानचा 'किसी का भाई,किसी की जान' या सिनेमाचं शूटिंग करत आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहे. सिनेमात व्यंकटेश डग्गुबत्ती आणि पुजा हेगडे, सिद्धार्थ निगम,राघव जुयाल हे कलाकार देखील दिसणार आहेत. सलमानचा जीजाजी अभिनेता आयुष शर्मा आधी या सिनेमात काम करणार होता,पण काही कारणानं हा सिनेमा त्यानं सोडला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com