सैफच्या मुलाचा पहिला सिनेमा साऊथचा? करण जोहरनंच घेतलाय पुढाकार

करणनं आतापर्यत अनेक स्टार किड्सला लॉन्च केलं आहे. ज्यात वरुण धवन,आलिया भट्ट अशा अनेक सुरपस्टार्सचा समावेश आहे.
Karan Johar to launch Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan in Hridyam remake..
Karan Johar to launch Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan in Hridyam remake..Google

बॉलीवूड निर्माता आणि दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar) नेहमीच नव्या चेहऱ्यांना बॉलीवूडमध्ये लॉन्च करताना आजपर्यंत दिसला आहे. त्यातील सगळे चेहरे हे कोणत्या ना कोणत्या बड्या स्टारच्या मुलांपैकी होते हे वेगळं सांगायला नको. आता करण जोहर सैफ अली खान आणि अमृता सिंगचा मुलगा इब्राहिम अली खानला बॉलीवूडमध्ये लॉन्च करण्याची तयारी सुरू करीत आहे.

Karan Johar to launch Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan in Hridyam remake..
बोनी कपूर यांच्यासोबत कसा झाला cyber fraud? कोणी उडवले पैसे,कसे केले खर्च?

एका वेबसाईटला मिळालेल्या माहितीनुसार इब्राहिम साऊथचा सुपरहिट सिनेमा 'हृदयम' च्या रीमेकमधून बॉलीवूड मध्ये पदार्पण करणार असल्याचं बोललं जात आहे. या मल्याळम सिनेमात सुपरस्टार मोहनलालचा मुलगा प्रणव मोहनलाल मुख्य भूमिकेत होता. बोललं जात आहे की हिंदीमध्ये या सिनेमाचा रीमेक करण्यासाठी करण जोहरसोबत फॉक्स-स्टार स्टुडिओ देखील निर्मात्याच्या भूमिकेत काम पहणार आहेत.

Karan Johar to launch Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan in Hridyam remake..
अश्लील सिनेमे पहायची आलिया कश्यप; सेक्स लाइफविषयी केले हैराण करणारे खुलासे

एका सूत्रानं दिलेल्या माहितीनुसार हे देखील कळत आहे की, ''इब्राहिमच्या लॉन्चिंग साठी हा एक उत्तम प्रोजेक्ट आहे. तो गेल्या काही दिवसांपासून एका चांगल्या सिनेमाच्या प्रतिक्षेत होता. या सिनेमाता एका विद्द्यार्थ्याची कहाणी दाखवण्यात आली आहे. आणि ही गोष्ट इब्राहिमच्या आताच्या वयाला साजेशी आहे''. खरंतर,करण जोहर हा इब्राहिची मोठी बहिण आणि बॉलीवूडची सध्याचा हिट अभिनेत्री सारा अली खानला देखील लॉन्च करणार होता. पण करणचा सिनेमाचा बऱ्याच दिवसांसाठी पुढे ढकललला गेला आणि मग अभिषेक कपूरच्या 'केदरनाथ' या सिनेमातून सारा आली खाननं बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं.

Karan Johar to launch Saif Ali Khan's son Ibrahim Ali Khan in Hridyam remake..
'प्राजक्ता माळी माझी लेडी क्रश,तिच्यासोबत रोमान्स...'- ऋतुजा बागवे

आता इब्राहिम अली खान करण जोहरच्या आगामी 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमासाठी सहाय्यक दिग्दर्शकाची भूमिका पार पाडत आहे. करण जोहरनं याआधी वरुण धवन,आलिया भट्ट,सिद्धार्थ मल्होत्रा,जान्हवी कपूर,शनाया कपूर अशा स्टार किड्सना बॉलीवूडमध्ये लॉन्च केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com