करोडपती करण जोहरचं थाळीप्रेम!

जया बच्चन यांच्या 'कभी खुशी कभी गम' सिनेमातला थाळी सीन पुन्हा रंगणार...
Karan Johar, Jaya Bachchan
Karan Johar, Jaya Bachchan

करण जोहरचे सिनेमे म्हणजे सगळाच मोठा तामझाम. स्टार सेलिब्रिटी,स्टायलिश कपडे,चकाकणारी हेवी ज्वेलरी आणि मोठे सेट्स असं एकंदरीत गणित जुळून येतं ते दिग्दर्शक करण जोहरच्या सिनेमातनं. त्याच्या सिनेमात लव्हस्टोरी ही नेहमीच केंद्रस्थानी. एखादा नवीन सिनेमा भेटीस आणल्यावर करण त्याच्यात जुन्या सिनेमातली एखादी आठवण तरी दाखवतोच. काही नाही तर 'कुछ कुछ होता है' सिनेमातलं गाणं तरी वाजतंच मधनं कधीतरी.

आता करण जोहर आणखी एक बिग बजेट सिनेमा घेऊन आपल्या भेटीस येतोय. रणवीर सिंग,आलिया भट्ट,शबाना आझमी,जया बच्चन,धर्मेंद्र अशी मोठी स्टारकास्ट या सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचं नाव 'रॉकी और रानी की प्रेम' कहानी आहे. नुकतंच या सिनेमाचं ५० दिवसांचं शुटिंग पूर्ण झाल्याच्या निमित्तानं करणनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर सिनेमाच्या मेकींगचा एक छोटा व्हिडिओ शेअर केलाय. रणवीर-आलीयाला या टीझरमध्ये पाहतानाच सर्वात लक्षवेधी ठरतायत त्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन.

Karan Johar, Jaya Bachchan
"सलमान भडकला अनं बोलून गेला; राखीचा नवरा फेक''

जया बच्चन याआधीही करणच्या 'कल हो ना हो' आणि 'कभी खुशी गम' या सिनेमात आपल्याला दिसल्या आहेत. जया बच्चन यांनी त्या दोन्ही सिनेमात साकारलेली आई अधिक भाव खाऊन गेलेली. त्यात 'कभी खुशी कभी गम' सिनेमात शाहरुख आणि जया बच्चन यांच्यातलं आई-मुलाचं नातं अधिक पसंत केलं गेलं. त्यामुळे त्या सिनेमातले दोघांमधले बरेचसे सीन आज इतक्या वर्षानंतरही प्रेक्षकांच्या डोक्यात फीट बसलेत. प्रत्येक वेळेला मुलाच्या येण्याआधीच चाहूल लागणारी आई जया बच्चन यांनी बखुबी वठवलीय. या सिनेमात या सीनसोबतच अशा ब-याच गोष्टी आहेत ज्या आजही डोळ्यासमोर स्पष्ट दिसतात. त्यातलीच एक गोष्ट म्हणजे जया बच्चन यांच्या हातातली लख्ख चमकणारी पुजेची चांदीची थाळी.

Karan Johar, Jaya Bachchan
गौतमी देशपांडेचं रिलेशनशीपवरनं स्पष्टीकरण!

करण जोहरचं आजही ते थाळीप्रेम कायम आहे हे त्याने 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' च्या शुटिंगची काही क्षणचित्र टीझरच्या निमित्तामे शेअर केली त्यावरनं कळतंय. 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' या सिनेमात जया बच्चन अगदी तिच थाळी हातात पकडून पूजा करताना दिसतायत. जणू काही 'कभी खुशी कभी गम' सिनेमातला तो सीनच आपण पाहतोय की काय याचा भास यावरनं होतोय. आता हा बिगबजेट सिनेमा नवीन वर्षात २०२३ च्या फेब्रुवारी महिन्यात 10 तारखेला आपल्या भेटीस येतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com