
Karan Kundrra Tejasswi Prakash: बिग बॉसची विजेती स्पर्धक तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा हे नेहमीच त्यांच्या वेगळेपणासाठी चर्चेत असणारे सेलिब्रेटी हे त्यांच्या बोल्डनेससाठी ओळखले जातात. काही महिन्यांपूर्वी त्यांचा गोव्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते सार्वजनिक ठिकाणी किसिंग (Viral video) करताना दिसले होते. त्यावरुन त्यांना नेटकऱ्यांनी ट्रोल केले होते. मात्र (Entertainment News) त्याचा कोणताही परिणाम या जोडप्यावर झालेला दिसत नाही. आताही त्यांचा लिप लॉक सीन व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी त्यांची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. कुठेही मोकळी जागा दिसण्याचा अवकाश की, तुम्ही सुरु होता. अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
तेजस्वी आणि करण हे नेहमीच सोशल मीडियावर बातमीत असणारे चेहरे आहेत. ते त्यांच्या फोटो, व्हिडिओ आणि पोस्ट यामुळे लक्ष वेधून घेताना दिसतात. बिग बॉसच्या 15 व्या सीझनमध्ये तेजस्वीची करणसोबत ओळख झाली. त्यांच्यात झालेल्या मैत्रीनंतर ते प्रेमात पडले. त्यांच प्रेम हे अनेकदा सार्वजनिक ठिकाणी रंगात येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे त्यांच्यावर टीका होताना दिसत आहे. आताही त्यांचा एका खोलीतील लिप लॉक सीन व्हायरल झाला आहे. तो पाहून नेटकऱ्यांनी त्यांना त्यांच्यातील वैयक्तिक गोष्टी या कशाकरिता सार्वजनिक करता असा सवाल विचारला आहे.
लिफ्टच्या जवळ उभा असलेल्या करणला तेजस्वीला इंप्रेस करण्याचा मोह काही आवरला नाही. तेजस्वी देखील त्या प्रतिक्षेत होती. यासगळ्यात त्याव्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. त्यावर त्यांना मिळालेल्या प्रतिक्रिया देखील बोलक्या आहेत. काहींनी त्या व्हिडिओचे कौतूक केले आहे. तर काहींनी त्या दोन्ही सेलिब्रेटींचे कान टोचले आहे. अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करुन काय मिळते, प्रसिद्धी मिळवण्याकरिता आणि चर्चेत राहण्याकरिता हे असचं केलं पाहिजे का, अशा शब्दांत नेटकऱ्यांनी त्यांचा राग व्यक्त केला आहे.
तुम्ही आता लग्न करुन टाका, दरवेळी तुम्ही अशाप्रकारचे व्हिडिओ पोस्ट करुन सोशल मीडियावर वेगळा मेसेज का देता अशी गंमतीशीर प्रतिक्रिया देण्याचा मोह नेटकऱ्यांना आवरलेला नाही. काही दिवसांपासून तेजस्वी आणि करणच्या लग्नाची चर्चा सुरु आहे. मात्र तारखेबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.